स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता.8) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 64 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल धंतोली झोन अंतर्गत प्रभाग न.17, कॉटन मार्केट येथील नारायण ट्रेडर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच हायटेक कार्पोरेशन यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे हनुमाननगर झोन अंतर्गत दिवान ले-आऊट, मानेवाडा बेसा येथील M/s Donode Builder यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

NewsToday24x7

Next Post

पारिजात कॉलनी येथे जागतिक महिला दिन साजरा

Thu Mar 9 , 2023
– महिलांनी अधिक सक्षम होण्याची गरज – प्रा. वैशाली नांदुरकर अमरावती :-आज अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर आहे. पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करित आहेत. पण अजुनही महिलांना पाहीजे तसा सन्मान व दर्जा आणि समानता समाजात मिळालेली नाही. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला सक्षमीकरणासाठी पावले उचलली जातील व महिला अधिक सक्षम होतील असे मत प्रा. वैशाली नांदुरकर यांनी व्यक्त केले. शहरातील पारिजात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com