स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता.11) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 2 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 15,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 4 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल लक्ष्मीनगर झोन अंतर्गत दिनदयाल नगर, राधेमंगलम चौक येथील बॉम्बे चाट हाऊस यांच्याविरुध्द कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत मस्कासाथ, इतवारी येथील पटेल क्लॉथ या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत रामकृष्ण नगर, नेल्को सोसायटी येथील स्नेह मिलन विकास संस्था यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोन अंतर्गत बजाज नगर चौक येथील ताज मटका रोटी यांच्याविरुध्द दुकानातील कचरा रस्त्यालगत टाकल्याबद्दल आणि कचरा शुल्क न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत उमरेड रोड येथील V2 Bar & Restaurent हरित न्यायाधिकरण कायद्यांतर्गत जेवण/अन्न वाया घालवतांना आढळल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

 

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जुन्या आठव्णींना उजाळा... विद्यामंदीरचे विद्यार्थी 32 वर्षानंतर भेटले.

Sat Nov 12 , 2022
नागपूर :- साधारण 32 वर्षापुर्वी दहावीतील सर्व मित्र-मैत्रिणींना परत एकदा एकत्र त्याच वर्गखोलीत बसून परत तेच जुने दिवस आठवण्याचा अनुभव कोराडी येथील विद्यामंदीर शाळेतील 1990 च्या ‘दहावी – अ’ च्या विद्यार्थ्यांनी नुकताच घेतला, एव्हढेच नव्हे तर आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत या विद्यार्थ्यांनी आयुष्यभर मैत्री कायम ठेवण्याचा देखील संकल्प केला. मैत्री हा शब्द अगदी स्टिरियोटाइप वाटतो, पण बाल मित्रांना या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com