उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस च्या घरात बॉम्ब फोडण्याची धमकी देणारा आरोपी रमानगरचा..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 28 :- केंद्रीय परिवहन मंत्री यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्याच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरात बॉम्ब ठेवला असून तो मी फोडणार आहे अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्याची घटना काल रात्री 11 वाजता घडली असता यासंदर्भात एकच तारांबळ उडाली.मात्र नियंत्रण कक्षाला खुद्द धमकीचे फोन करणाऱ्या या आरोपीचा शोध लावण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाला असून हा आरोपी कामठी शहरातील रमानगरचा रहिवासी असून अटक आरोपीचे नाव कुंदन गौतम हिरे वय 23 वर्षे रा.रमानगर कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर आरोपी मूळचा कन्हान येथील धरम नगर वार्ड क्र 3 पिपरी कन्हान चा रहिवासी असून हल्ली कामठी रामानगर येथील भाड्याने वास्तव्यास आहे.सदर आरोपी ने आपल्या जवळील मोबाईल क्र 7558611715 ने काल 27 मार्च ला रात्री 10.45 वाजता माहिती पोलीस नियंत्रण कक्षातील आपत्कालीन सेवा क्र 112 वर फोन करून दहशत व भीती पसरवणारे माहिती दिली ज्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या नागपूर च्या राहत्या घरात बॉम्ब ठेवला असून तो मी आता फोडणार आहे अशी खुद्द कबुली दिल्याने सर्व पोलीस यंत्रणेत खळबळ माजली यावर पोलिसांनी बॉम्ब शोध पथक सह आदी पोलीस यंत्रणा राबवून बॉम्ब चा शोध घेत सावधानतेचा ईशारा दिला मात्र असा कुठलाही प्रकार अस्तित्वात दिसून आला नाही त्यामुळे नमूद आरोपीने दहशत पसरविणेकरिता तसेच सार्वजनिक प्रशांतते विरुद्ध अपराध करण्यास प्रवृत्त होईल अशा प्रकारे नागरिकांत भीती किंवा भयग्रस्तता निर्माण करण्याच्या उद्देशाने फोन केला असल्याचे तर्क लावन्यात आल्यावरून सदर फोन चा तपास यंत्रणेद्वारे शोध घेऊन आरोपीचा शोध कामी दिलेल्या गतीवरून सदर फोन वरून खोटी माहिती देऊन प्रशासनाला वेठीस धरण्यात आले. यावरून आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील रमानगर कामठी चा रहिवासी निघाला.सदर आरोपीला त्वरित ताब्यात घेत त्याविरुद्ध भादवी कलम 505(1),(ब)आयपीसी आर डब्लू 85 मदाका अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com