नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.20) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. सानु मुर्ती भंडार, हुडकेश्वर रोड, नागपूर यांच्यावर पीओपी च्या मुर्ती विक्रीकरीता ठेवल्याबाबत कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच श्याम भोयर, छोटा ताजबाग रोड, नागपूर यांच्यावर फूटपाथवर बांधकामाचा कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शुभम भालकर, नरसाळा रोड, नागपूर यांच्यावर फूटपाथवर बांधकामाचा कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. दिनेश मुर्ती भंडार, भाव नगर चौक, नागपूर यांच्यावर पीओपी च्या मुर्ती विक्रीकरीता ठेवल्याबाबत कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्याउपद्रव शोध पथकाद्वारे विनोद तुलसीराम गुप्ता, हाजी हाऊस चौक, बिनाकी नागपूर यांच्यावर रस्त्यावर कचऱ्या टाकल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : पीओपी मुर्ती विक्रेत्यांवर कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com