कामठी पंचायत समिती कार्यलयात ‘ स्वच्छता ही सेवा ‘ उपक्रम 

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी दि. 16 :- महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता ही सेवा हा उपक्रम दि.15 सप्टेंबर ते 2ऑक्टोबर 2022 पर्यंत राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज 16 सप्टेंबरला पंचायत समिती कामठी येथे स्वच्छतेचे दूत संत गाडगे बाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून स्वछता ही सेवा उपक्रम अंतर्गत श्रमदान करण्यात आले.

या उपक्रमात कामठी पंचायत समितीचे सभापती उमेश रडके, उपसभापती आशिष मल्लेवार,जिल्हा परिषद सदस्य प्रा अवंतिका लेकुरवाळे, गट विकास अधिकारी अंशुजा गराटे, पंचायत समिती सदस्य  दिलीप वंजारी,  दिशा चनकापुरे,सहा. गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले यासह पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी नगर परिषद च्या कामासंदर्भात नाराजीचा सूर

Fri Sep 16 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -प्लास्टिक बंदीबाबत कामठी नगर परिषदची उदासींनताच, कारवाही नसल्याने प्लास्टिक वापर वाढले,  कामठी दी.16 :- शासनाने प्लास्टिक पिशव्या बंदीची अंमलबजावणी केली आहे. देशात प्लास्टिक पिशव्या वापरणारे आणि विकणाऱयांवर दंडात्मक कारवाहीचा आदेश देण्यात आला असून प्लास्टिक पिशवी बंदीची अंमलबजावणी केली जात असली तरी कामठी तालुक्यात मात्र प्लास्टिक पिशव्या चा वापर खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. प्लास्टिक पिशव्या मानवी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com