शेतकऱ्यांनी अनधिकृत एच टी बी टी बियाणे खरेदी करू नये – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांचे आवाहन

गडचिरोली :- शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवडीसाठी एचटीबीटी (चोर बीटी) बियाणे खरेदी करू नये असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे. जिल्ह्यातील सध्या बाजारात बोगस बियाणे खाजगी व्यक्ती मार्फत छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. या अवैध बियाण्यांना शासनाची कोणतीही कोणतीही मान्यता नाही. अश्या प्रकारचे बियाणे विक्री करणे, बाळगणे, साठा करणे गुन्हा आहे. या प्रकारचे लागवड केलेल्या कापूस पिकाची पाने व कापसाचे नमुने तपसणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे. यात एच टी बी टी आढळून आल्यास संबंधितावर कार्यवाही करण्यात येणार आहे. सदर एचटीबीटी लागवड केल्याने जामिनाचा ऱ्हास होऊन जमिनी कालंतराने नापीक होतात. मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतो. तरी शेतकऱ्यांनी अधिकृत कापूस बियाणे लागवड करावे.

एखाद्या व्यक्तीकडे अनधिकृत एच टी बियाणे आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात येईल. एचटीबीटी बियाणे विक्री करणाऱ्या लोकांवर कृषी विभाग लक्ष ठेवून असून टीम ACTIVE केली असून आष्टी परिसर व आजूबाजूच्या परिसरात कृषी विभाग स्वत: लक्ष देऊन आहेत. शक्य तीथे पोलीस विभागाची मदत घेतली जात आहे. असे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गडचिरोली, संजय मेश्राम यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

येरखेड्यात इसमाची गळफास लावून आत्महत्या

Mon May 13 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथे काल 11 मे ला सकाळी 8 वाजता यशोदा शाहू नामक 28 वर्षीय नवविवाहित महिलेने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडण्याला विराम मिळत नाही तोच आज येरखेडा येथील बर्फ कंपनीच्या मागे राहणाऱ्या लांजेवार कुटूंबातील 60 वर्षोय इसमाने घरात कुणी नसल्याचे संधी साधुन राहत्या घरातील छताला साडीने […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com