नागपूर :- दि. 30 व 31 जानेवारी 2025 राजाराम सीताराम दीक्षित वाचनालय, सीताबर्डी, नागपूर येथे राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘शोध नागपुरच्या युवा वक्त्याचा’ ही आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत कमला नेहरू कनिष्ठ महाविद्यालय, सक्करदरा चौक, नागपूर येथील एम. कॉम.चा विद्यार्थी उपेंद्र गुप्ता हह्याला ‘उत्कृष्ट वक्ता’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत एकूण 118 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अमर सेवा मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय डॉ. श्रीमती सुहासिनी वंजारी यांनी उपेंद्र गुप्ता या विद्यार्थ्यांचे हार्दीक अभिनंदन करून कौतुक केले. त्याला मिळालेल्या यशाबद्दल अमर सेवा मंडळाचे सचिव तथा पदवीधर मतदारसंघ नागपूर विभागाचे आमदार अॅड. अभिजीत वंजारी व अमर सेवा मंडळाच्या कोषाध्यक्षा तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या डॉ. सौ. स्मीता वंजारी यांनी सुध्दा उपेंद्र गुप्ताला शुभेच्छा दिल्या. तसेच कमला नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप बडवाईक यांनीही उपेंद्र गुप्ताचे अभिनंदन केले. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षिका सौ. मेघा राऊत यांनी उपेंद्र गुप्ता ह्याला स्पर्धेकरिता मार्गदर्शन केले.