संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आंबेडकर वाचनालय,रमानगर येथील बादल देशभ्रतार यांच्या घराजवळ सुरू असलेल्या वाढदिवस कार्यक्रमात मोठ्या कर्कश आवाजाने डी जे सुरू असल्याने हा डी जे बंद करायला आलेल्या पोलिसांना तेथील गैरकायद्याच्या मंडळीने पोलिसांच्या या कारवाहीत अडथळा निर्माण करून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करीत धमकावत, हातबुक्क्यासह दगड विटानी मारहाण करत त्यांना चावा सुद्धा घेतल्याची घटना 19 जानेवारी 2021 ला रात्री साडे 10 वाजता घडली होती .यासंदर्भात फिर्यादी पोलीस शिपाई राष्ट्रपाल दुपारे ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आकाश देशपांडे वय 27 वर्षे व त्याचे नातेवाईक तसेच बादल देहभ्रतार वय 27 वर्षे व इतर असे एकूण 9 आरोपी विरुद्ध भादवी कलम 353,323,336, 332,341,143,147,148,149 अनव्ये गुन्हा दाखल केला होता .या प्रकरणाची सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत जिल्हा न्यायाधीश -6 व सत्र न्यायाधीश नागपूर शिल्पा बैस यांनी यातील सात आरोपीना निर्दोष मुक्त करीत दोन आरोपीना 3 वर्षाच्या साधा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.शिक्षा झालेल्या या दोन आरोपीमध्ये आकाश देशपांडे वय 27 वर्षे व बादल देशभ्रतार वय 27 वर्षे दोन्ही राहणार आंबेडकर वाचनालय जवळ,रमानगर कामठी असे आहे.
या गुन्ह्या प्रकरणाचा तपास तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे यांनी केला असून तपासात पोलीस शिपाई सुरेंद्र शेंडे,रोशन डाखोरे,सारवे,आत्राम यांनी मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका बजावली.