बी एस एन एल सुरक्षारक्षकाची संशयास्पद आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कन्टोन्मेंट परिसरात बंगला नं 10 येथे मागील दहा दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेच्या घरात शिरून तिच्यावर लोखंडी प्रेस ने वार करून गंभीर जख्मि केल्याच्या घटनेला विराम मिळत नाही तोच याच कन्टोन्मेंट परिसरात असलेल्या बीएसएनएल कार्यलयाच्या सुरक्षा रक्षकाची रात्रपाळीला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली असून या घटनेत घातपात झाला असून ही आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप मृतकाचे स्वकीय घरमंडळी करीत असल्याने या घटनेत सुरक्षा रक्षकाची संशयासद आत्महत्या घडली असून मृतकाचे नाव अनिल मेश्राम वय 44 वर्षे रा जुनी खलाशी लाईन कामठी असे आहे.

..सदर मृतक हा मागील एक वर्षापासून कामठी कन्टोन्मेंट परिसरातील बीएसएनएल कार्यालयात सुरक्षारक्षक पदावर खाजगी पद्ध्तीने कार्यरत असून नेहमी प्रमाणे दोन दिवसापूर्वी रातपाळीला नोकरीवर गेले तर दैनंदिन रित्या सकाळी घरी परतले नसल्याने मृतकाच्या पत्नीने शोधाशोध केली मात्र कुठेही थांगपत्ता लागला नव्हता शेवटी आपला पाच वर्षोय मुलाला सोबतीला घेऊन पायी पायी चालत बीएसएनएल कार्यालय गाठले.प्रवेशद्वार बंद होते त्यातही दिसून आले नाही तेव्हा यांच्या गार्ड खोलीत डोकावून बघितले असता गार्ड खोलीच्या खिडकीला बेडशीट ने गळफास लावल्याचा स्थितीत आढळुन आल्याने एकच धक्का बसला.

..घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय उपजील्हा रुग्णलयात मृतदेहाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी कुठलेही तणाव नसताना आत्महत्यांचा प्रकार घडल्याने ही आत्महत्या नसून हत्या झाल्याचा आरोप मृतकाचे घरमंडळी करीत असून पोलिसांनी त्या दिशेने तपास करावा अशी मागणी जोर धरत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवक काँग्रेस व्दारे काढला मशाल मोर्चा

Tue Feb 27 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – ” रोजगार दो, न्याय दो ” युवक काँग्रेस ची मागणी.   कन्हान :- नागपुर जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व रामटेक विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने कन्हान येथे भारतात वाढत्या बेरोजगारी विरोधात ” रोजगार दो, न्याय दो ” या उपक्रमाच्या माध्यमातुन मशाल मोर्चा काढण्यात आला. अखिल भारतीय युवक काँग्रेस चे अध्यक्ष श्रीनिवास यांच्या आदेशानुसार जिल्हा काँग्रेस कमेटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com