बहिण भावाची सुसाट रेल्वे नागपुरात थांबली

– लोहमार्ग पोलिसांनी दोघांनाही घेतले ताब्यात  

नागपूर :-भाऊ चांगली वागणूक देत नाही, असा आरोप करून 14 वर्षाची मुलगी काकाच्या मुलासोबत रेल्वेने पळाली. नागपूर रेल्वे स्थानकाच्या जनरल प्रतिक्षालयात असताना लोहमार्ग पोलिसांचे लक्ष पडले. अल्पवयीन मुलगी असल्याने पोलिसांनी विचारपूस करून त्यांना ठाण्यात आणले. मुलाची सुटका केली तर मुलीला मुलींच्या शासकीय वसतिगृहात ठेवण्यात आले.

सीमा (काल्पनिक नाव) असे त्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. ती उत्तर प्रदेशची आहे. तीला आई वडिल नाहीत. तिला आजी आहे, तीचे सांभाळ मोठा भाऊ करतो. जवळच चुलत भाऊ राहतो. काकाचा मुलगा असल्याने त्यांच्यात दररोज बोलचाल व्हायची. त्यामुळे दोघेही जवळ आले. मोठा भाऊ चांगला सांभाळ करीत नाही, असा ठपका ठेवून दोघांनीही घरून पळून जाण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे दोघेही 18 एप्रिलला रेल्वे गाडीत बसले. 19 एप्रिलला नागपूर रेल्वे स्थानकावर उतरले आणि जनरल प्रतिक्षालयात थांबून होते.

लोहमार्ग पोलिस प्रणाली चातरकर आणि पुजा आगासे हे कर्तव्यावर होत्या. फलाट क्रमांक एकवर असताना दोघेही प्रतिक्षालयात दिसले. सीमा अल्पवयीन असल्याने त्यांनी दोघांचीही विचारपूस केली. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिस निरीक्षक मनीषा काशीद यांना दिली तसेच चाईल्ड लाईनलाही माहिती देण्यात आली. दोघेही नागपुरातील नातेवाईकांकडे आठवडाभर थांबणार होते. त्यांच्या माहितीवरुन कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांना माहिती देण्यात आली. तसेच नागपुरातील नातेवाईकही ठाण्यात पोहोचले. अल्पवनीय मुलीच्या भावानेही फोन करून सीमाला नागपुरातील नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची विनंती केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी चाईल्ड लाईनच्या मदतीने शासकीय मुलींच्या वसतिगृहात ठेवण्यात आले. उत्तर प्रदेशात मुला विरूध्द गुन्हा दाखल नसल्याने त्याची सुटका करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून मानवी हक्क दिले - माजी राज्यमंत्री ऍड सुलेखा कुंभारे

Sun Apr 21 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – कामठीत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वॉकथॉन कामठी :- विश्वभूषण ,बोधिसत्व ,परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरानी भारतीय संविधानातून देशातील नागरिकांना संविधानिक हक्क व अधिकार प्राप्त करून दिले .देशातील नागरिकांनी आपले जीवन संविधानिक पद्ध्तीने ज्ञापन करावे तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचार ,संदेश जीवनात आत्मसात करणे आवश्यक असून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून मानवी हक्क दिले असल्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com