– दापोरी येथील शकडो विद्यार्थ्यांचा संस्कार शिबिरात सहभाग !
मोर्शी :- मोर्शी तालुक्यातील ग्राम दापोरी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 56 वा स्मृती महोत्सव व सर्व संत स्मृती मानवता दिन निमित्त ग्रामगीता प्रवचन सप्ताहाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत करण्यात आले असून त्यामध्ये श्री गुरुदेव संस्कार शिबिराचे आयोजन केले असून सकाळी पाच वाजता आदर्श दिनचर्या सुरुवात होऊन सकाळी उठणे सामुदायिक ध्यान, प्राणायाम, योगा, मल्लखांब, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, व्यसने भारतीय संस्कृती थोर संतांचे कार्य, इत्यादी विषय बौद्धिक तासाच्या माध्यमातून शिकविले जातात मुलांना बौद्धिक खेळ खेळल्या जात आहे. त्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होत आहे सायंकाळी सामुदायिक प्रार्थना, रात्री कथाकथन व राष्ट्र वंदना घेतली जात आहे. या सर्व गोष्टीमुळे विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कार पेरणीचे काम संस्कार शिबिरच्या माध्यमातून ग्रामगीताचार्य रायजीप्रभू शेलोटकर महाराज करीत असून यांच्यासह दापोरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंडळाचे पदाधिकारी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना विविध विषयाचे ज्ञान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे म्हणून आज सुसंस्कार शिबिर काळाची गरज बनले आहे.
आजचा बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील गावाचा देशाचा पांग फेडतील उत्तम गुणांनी या कलियुगाच्या काळात आजचा तरुण मोबाईल टीव्ही च्या नादात दिशाहीन झालेला आहे, त्यामुळे त्याच्या मनावर सतत कुसंस्कार पडत असून आज समाजात चोरी व्यसनाधीनता बलात्काराचे प्रमाण वाढत आहे मुले आई- वडिलांचे ऐकत नाही. आजचे अनेक तरुण वाईट व्यसनांच्या नादी लागल्याचे दिसत असून त्या तरुणाला दिशा द्यायची असेल तर आज राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेला तरुण जो निर्व्यसनी असेल, राष्ट्रप्रेमी असेल शरीराने धडधाकट घडवायचा असेल तर आज सुसंस्कार शिबिरातूनच तो विद्यार्थी घडते. कारण सुसंस्कार शिबिरामध्ये आदर्श दिनचर्या असते विविध विषयाचे बौद्धिक दिले जाते. त्यामुळे विद्यार्थी मनावर चांगले संस्कार होते बंधुप्रेम, आई- वडिलांची सेवा गाडगे बाबांची दशसुत्री, राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्य, भगवद्गीता ग्रामगीता, रामायण, इत्यादी ग्रंथाचा अभ्यास सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विविध गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला जातो. आदर्श थोर पुरुषांचे चरित्र, संतांचे चरित्र विद्यार्थ्यांच्या बालमनावर परिणाम करून जातात म्हणून आज संस्कार शिबिराची काळाची गरज आहे. असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य रायजीप्रभू शेलोटकर महाराज यांनी केले.