अवैद्य वाळु वाहतुकीवर पोलीस अधिक्षक विषेश पथकांची कारवाई

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

 दहा चाकी ५ ट्रक, ३३ ब्रास रेती सह एकुण एक करोड पेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त. 

 १५ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. 

कन्हान :- पोलीस स्टेशन हद्दीत नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक विषेश पथक पोलीसांनी अवैद्य वाळुची वाहतुक आणि बनावट नंबर प्लेट लावुन शासनाची दिशा भुल करुन फसवणुक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करुन पाच ट्रक, ३३ ब्रॉस रेती सह एकुण एक करोड पेक्षा अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन १५ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक विषेश पथक पोलीसांच्या मोठ्या कारवाई मुळे अवैद्य वाळुची वाहतुक करणा ऱ्यांचे दाबे दणाणले असुन कन्हान पोलीसांच्या कार्य प्रणालीवर प्रश्न निर्माण झाले आहे.

प्राप्त माहिती नुसार रविवार आणि सोमवार ला रात्री च्या दरम्यान नागपुर ग्रामिण पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा आदेशानुसार अवैधरित्या वाळु वाहतुकीवर कारवाई करने कामी नागपुर ग्रामिण पो लीस अधिक्षक विषेश पथक पोलीस कन्हान परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली कि परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रक ला बनावटी नंबर प्लेट लावुन अवैद्य वाळुची वाहतुक सुरु आहे. अश्या विश्वसनीय माहिती वरुन पोलीसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करुन संशयित टिप्पर ट्रक क्र १) एम एच ४० ए.के ०२८३, २) टिप्पर ट्रक बनावटी वाहन क्र. एम एच ४० बी.जी १२६७, ३) एम एच ३५ ए जे ०१३१, ४) एम एच ४० बि एल १२८३, ५) एम एच ४९ बी झेड ९१६८ ला थांबवुन पाहणी केली असता ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात वाळु दिसुन आली. पो लीसांनी ट्रक चालकांना वाळुची राॅयल्टी विचारली असता राॅयल्टी नसल्याचे चौकशीत दिसुन आल्याने आणि बनावटी नंबर प्लेट लावुन वाळुची वाहतुक करतांना आढळुन आल्याने पोलीसांनी नऊ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ५ ट्रक, ३३ ब्रास रेती आणि मोबाइल, नगदी रुपये सह असे एकुण १,२७,९०,१६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पुढील कारवाई करिता कन्हान पोलीसांच्या स्वाधिन केले.

सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी सपोनि अमित पांडे, हवा. ललीत उईके यांचे तक्रारी वरून आरोपी १) मोरेश्वर दशरथ गोंडाने (वय ३३), २) रोहित रामदासजी भोले (वय २०), ३) नरेश कृष्णाजी चवरे (वय ३३), ४) रोशन मुरलीधर मेश्राम (वय २९), ५) फरार आकाश माहतो (वय ३०), ६) फरार राहुल तिवाडे (वय ३२) सर्व रा. कन्हान, कांद्री, ७) फरार लोकेश वहीले (वय २५), ८) भुषण देवीदास भुरे (वय २६ ), ९) अभिषेक दिलीप मेश्राम (वय २३) सर्व रा. कामठी, १०) फरार अक्षय राजु गात (वय २८), ११) लीखीराम बसीराम शेंडे (वय ३९) दोन्ही रा. नागपुर, १२) फरार चंद्रशेखर फुंडे रा. गोंदिया, १३) मनीराम सत्यराम जयतवार (वय ५४) रा.भंडारा, १४) विक्की मनोहर शेंडे (वय ३२) रा. उमरवाडा, १५) फरार मंगेश तुलाराम राऊत (वय ) रा.भंडारा यांच्या विरुद्ध कलम ४२०, ३७९, १०९, ३४ भादंवि सहकलम ४८ (८) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम -१९६६ प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन फरार आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर-अमरावती विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनांचा (सर्वसाधारण)उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

Tue Jan 9 , 2024
– महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे लक्ष्य; *केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा*https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 *केंद्रासह राज्याच्या निधीचे योग्य नियोजन करा;*https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 *आकांक्षित तालुक्यांसह जिल्ह्यांना अधिकचा निधी*https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.46.31_6d1c5419.mp4 *विदर्भातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी;* *नागपूर-अमरावती विभागात टुरिझम सर्कीट विकसीत करा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचना* मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातल्या ‘टॉप-5’वर पोहोचली आहे. येत्या काळात देशाची अर्थव्यवस्था ‘पाच ट्रिलियन’ डॉलर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com