सुनील केदार कारागृहातच राहणार, सत्र न्यायालयाने फेटाळला जामीन

नागपूर :- माजी मंत्री सुनील केदार यांचा जामीन नागपूर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. केदार यांना दिलेली शिक्षा चुकीची असल्याचे कुठलेही पुरावे सादर केले गेले नाही. त्यामुळे त्यांना जामीन दिल्याने समाजात चुकीचा संदेश जाईल, असे सांगत न्यायालयाने जामीन फेटाळला. याशिवाय केदार यांची दोषसिद्धीला स्थगिती देण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळून लावली.

शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील (भोसले) यांनी हा निर्णय दिला आहे. मागील आठवड्यात ट्रायल कोर्टाने केदार यांच्यासह सहा आरोपींना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. यांनतर मंगळवारपासून सत्र न्यायालयात दोषसिद्धीला स्थगितीसह जामिनावर सुनावणी सुरू होती. केदार यांच्यासह एक अन्य आरोपी अशोक चौधरी यांचाही जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. इतर आरोपींच्या जामिनावर २ जानेवारीला सुनावणी होईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यात अनुसूचित जाती घटकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Sat Dec 30 , 2023
मुंबई :- राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी राज्यात सुरू असून अनुसूचित जाती घटकाशी निगडित इतरही प्रश्न सर्व विभागांनी तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले. सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा तसेच मुंबई शहरातील विविध प्रश्नाबाबत राज्यमंत्री आठवले यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत विविध विभागांकडून आढावा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com