बैलगाडया शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध : सुनील केदार

नागपुर : बैलगाडया शर्यती हा राज्यातील शेतक-यांचा जिव्हाळयाचा विषय आहे. या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असल्याची माहिती पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिली.
राज्यात बैलगाडया शर्यती सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. बैलगाडया शर्यतीसंदर्भात वरिष्ठ अधिवक्ता आणि राज्य शासनाचे वकील यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी श्री केदार आज दिल्लीत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.  महाराष्ट्राने बैलगाडी शर्यत सुरू होण्याबाबत 2017 रोजी कायदा संमत केला होता. तथापि, त्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती.  त्यानंतर, शासनाने या आदेशास अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हे प्रकरण विस्तारित बेंचकडे प्रलंबित असून पुढील आठवडयात याबाबत निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या सविस्तर चर्चेसाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने उपस्थित अधिवक्त्यांशी चर्चा करण्यात आले असल्याचे श्री केदारे यांनी नमूद केले.
देशातील इतर राज्यात तामिळनाडू, कर्नाटका, मध्यप्रदेश आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाडयांच्या शर्यती होत असतात. मात्र मुंबई उच्च न्यायालायाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात शर्यतींना बंदी लावण्यात आली आहे. ही बंदी उठवावी व बैलगाड्यांच्या शर्यती पुन्हा राज्यात सुरू व्हाव्यात यासाठी आपण दिल्लीत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राज्यशासन यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत असून यावर अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने द्यावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने वरीष्ठ अधिवक्ता म्हणुन ऍड मुकूल रोहतगी, ऍड शेखर नापडे आणि ऍड सचिन पाटील  यांची नेमणूक केल्याची त्यांनी माहिती दिली.
महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीची 400 वर्षांपेक्षा जूनी पंरपरा आहे. “बैलगाडी शर्यत” हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. शर्यतीसाठी शेतकरी खास खिल्लार जातीचे बैल वापरतात त्यांचे संगोपण करतात. खिल्लार ही महाराष्ट्रातच सापडणारी बैलांची जात आहे. शर्यती बंद असल्यामुळे खिल्लारच्या खोडांना मागणी बंद झाली, तसेच शर्यती बंद असल्यामुळे गावांच्या जत्रा भरत नाहीत. शेतक-यांच्या जीवनातील हा सांस्कृतिक  भाग म्हणुन याकडे पाहण्यात यावे, अशी मागणीही बैलगाडा संघटनेकडून असल्याचेही श्री केदार यांनी यावेळी सांगितले.
पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शैलेश येंडे, सहायक आयुक्त डॉ. प्रशात भड आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्याचे प्रतिनिधी श्री रामकृष्ण टाकळकर, संदीप बोदगे हे ही याप्रकारणच्या पाठपुराव्यासाठी राजधानी दिल्लीत आहेत.
दिनेश दमाहे 
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

OCHRI Physiotherapy & Restorative Camp on 20th & 21st Nov

Thu Nov 18 , 2021
Nagpur based Orange City Hospital & Research Institute; owned by Ravi Nair Hospitals Private Limited is always at the forefront of extending healthcare services to the local communities in and around its area as a part of its community development initiatives. As part of OCHRI’s 25th Anniversary;AADHAR Physiotherapy Clinic is conducting a subsidized camp for patients in need of physiotherapy. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com