रविवारी जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शून्यावर

  • रुग्ण डिस्चार्ज01
  • एकूण डिस्चार्ज58973
  • एकूण पॉझिटिव्ह60106
  • क्रियाशील रुग्ण00
  • आज मृत्यू शून्य
  • एकूण मृत्यू1133
  • रिकव्हरी रेट98.11 टक्के
  • मृत्यू दर01.89
  • आजच्या टेस्ट352
  • एकूण टेस्ट477510

भंडारा  : जिल्ह्यात रविवारी शून्य कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज (दि.5बरे झालेल्या रुग्णांची संख्या 01 आहे. रविवारी 352 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता एकही सक्रिय रुग्ण नाही.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58973 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60106 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 77 हजार 510 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 60106 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावीअसे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

  • कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.
  • जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत,त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.
  • सध्या सणासुदीचे दिवस आहेत आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • कोविड वर्तणूक नियमावलीचे पालन करावे,सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

CAIT DEMANDS STATE GOVERNMENTS TO END TIE UPs WITH CULPRIT AMAZON

Mon Dec 6 , 2021
New Delhi – It is most unfortunate and regrettable that several States in the Country have entered into MOU or Agreements or Amazon selling products of Government Agencies with biggest culprit of online trade in India, Amazon despite of the fact that Amazon is a known global law offender which has been penalised in different Countries for its mal-practices in […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!