स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही
रामटेक :- पो.स्टे. रामटेक हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना विश्वसनिय गुप्त बातमीदार मार्फत प्राप्त माहितीनुसार सोनालीका कंपणीचे ट्रॅक्टर संलग्न ट्रॉली मध्ये सुखा मौहफूल व गुड़ हा मोहफूल सडवा रसायन तयार करण्यासाठी वाहतूक करून नेत आहे. या खबरेवरून नगरधन किल्ला येथे नाकाबंदी करून ट्रॉली क्रमांक नसलेलीचा चालकाला थांबवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव युवराज बंडू सव्वालाखे वय ३३ वर्ष रा. नगरधन ता. रामटेक असे सांगितले. त्याचे ताब्यातील सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर संलग्न ट्रॉली ची तपासणी केली असता त्यामध्ये १२ सुतळी बोरी मध्ये मोहफुल रसायन सडवा तयार करण्यासाठी १) १२ सुतळी बोरी मध्ये प्रत्येकी ४० किलो प्रमाणे एकुण ४८० किलो सुखा मोहफुल एकूण किंमती २४,०००/- रु. २) १२ सुतळी बोरी मध्ये प्रत्येकी ४० किलो प्रमाणे एकूण ४८० किलो गुड एकूण किंमती २४,०००/- रु चा ३) ट्रॅक्टर संलग्न ट्रॉली क्रमांक नसलेला ट्रॅक्टर किंमती अंदाजे ५,००,०००/- रु असा एकूण ५,४८,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर जप्त मुद्देमाल व आरोपी ट्रॅक्टरचा चालक यांचे विरुद्ध पो. स्टे. रामटेक कलम ६९ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आले असून पुढील कागदपत्रे पो. स्टे. रामटेक यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोहार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार अमोल कुठे, रोशन काळे, किशोर वानखेडे, उमेश फुलबेल, शंकर मडावी, नितेश पिपरोदे, विपीन गायधने यांनी पार पाडली.