नागपुर :- सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर भारत विकास परिषदेच्या दक्षिण-पश्चिम शाखाध्यक्षपदी दिलीप गुळकरी यांची, तर सचिवपदी किशोर बेल्लुरकर यांची निवड करण्यात आली. परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी विदर्भ प्रांत अध्यक्ष संजय गुळकरी होते. मिलन काळे यांची वित्त सचिव पदी निवड करण्यात आली. सीमा मुन्शी आणि श्री अॅड. कौस्तुभ लुले हे शाखेच्या पालकमंत्री असतील.
भाविपच्या दक्षिण-पश्चिम शाखेची कार्यकारिणी अशी – अध्यक्ष – दिलीप गुळकरी, उपाध्यक्ष- जी. मुरली आणि उषा घुई, सचिव- किशोर बेल्लुरकर, सहसचिव- आसावरी गोसावी, वित्त सचिव -मिलन काळे, सह वित्त सचिव-स्नेहा पुजारी, बाल बालविकास प्रमुख – शुभांगी काकडे, सेवा प्रमुख – रवी संगवई, संस्कार प्रमुख – वेदश्री मांडवगणे, संपर्क प्रमुख – स्नेहल रानडे, प्रचार-प्रसार प्रमुख -अॅड.सुप्रिया पुणतांबेकर, ग्राम विकास प्रमुख – विजय घुगे, भारत को जानो संयोजक – सीमा इंदूरकर, राष्ट्रीय समूहगान संयोजक – अॅड. किशोर लांडगे, मार्गदर्शक – निलिमा बावणे आणि सारिका पेंडसे