संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या येरखेडा येथील दुर्गा ले आउट रहिवासी 28 वर्षीय नवविवाहितेची राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 वाजे दरम्यान घडली असून मृतक नवविवाहित महिलेचे नाव यशोदा शाहू वय 28 वर्षे असे आहे.आत्महत्येचे कारण अजूनही कळू शकले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक महिलेचे मागील तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.आज सकाळी सहा वाजता पती हा काही कामानिमित्त कामठी रेल्वे स्टेशन ला गेले असता सदर महिलेने घरात कुणी नसल्याचे संधी साधून अज्ञात कारणावरुन घराच्या छताच्या लोखंडी हुक ला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत कामठी च्या शवविच्छेदनगृहात शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.