लिहिगावात वाहनचालकाचा वाहनातच अकस्मात मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव येथील गौरी गणेश फेकट्री च्या आवारात फेरी मारून आलेल्या वाहनचालकाचा वाहनातच अकस्मात मृत्यू झाल्याची घटना नुकतेच दुपारी 3 दरम्यान घडली असून मृतकाचे नाव गोकुल गिरी वय 37 वर्षे रा वडरीया बुधवारी ,छिंदवाडा (मध्यप्रदेश)असे आहे.

घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागपूर च्या शासकीय रुग्णालयात हलवून मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ARMY ORGANISES BLOOD DONATION CAMP ON OCCASION OF WORLD BLOOD DONORS DAY

Wed Jun 14 , 2023
Nagpur :- As part of Indian Army contributing towards its fellow citizens and society through various activities, a Blood Donation Camp was organised under the aegis of Headquarters Uttar Maharashtra and Gujarat Sub Area at AFI Building at Nagpur Army Officers’ Mess and Institute (NAOMI) and Guards Regimental Centre, Kamptee on 14 June 2023 on the occasion of World Blood […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com