पंडित दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली, यांचे संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर मेळाव्यामध्ये अध्यक्षस्थानी प्रकाश देशमाने, उपआयुक्त कौशल्य,रोजगार, उद्योजकता व विभागीय आयुक्तालय, नागपूर, प्रमुख पाहूणे डॉ. अनिल हिरेखण, कुलसचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, व मार्गदर्शक म्हणून संतोष साळूंखे, प्राचार्य,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गडचिरोली, पवार जिल्हा उद्योग केंद्र,गडचिरोली, योगेंद्र शेंडे,सहायक आयुक्त्, जिल्हा कौशल्य् विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,गडचिरोली उपस्थित होते. मेळाव्यामध्ये विविध कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित झाले होते सदर कंपन्याकडे नोकरी करिता 67 रिक्तपदे व अप्रेंटिसशीप करिता एकूण 25 रिक्तपदे उपलब्ध् होते.

मेळाव्यामध्ये 141 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. सदर पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा कार्यक्रमाचे प्रास्ताविक गचके, सहायक प्राध्यापक, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, आणि सूत्रसंचालन प्रियंका इडपात्रे, यंग प्रोफेशनल,मॉडेल करिअर सेंटर,गडचिरोली व आभार प्रदर्शन गणेश चिमणकर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले. सदर रोजगार मेळावा यशस्वीकरण्याकरिता गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांनी सहाकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे जिल्हा प्रशासन दिव्यांग बांधवाच्या पाड्यावर दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) विशेष मोहिम कार्यक्रमाचे यसस्वी आयोजन

Sun Mar 5 , 2023
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देषाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आणि निर्धारित वेळेत दिव्यांग व्यक्तींना ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता जिल्हा परिषदेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात तालुका स्तरावर १८ ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहिम शिबिराचे आयोजन व नियोजन करून अंदाजे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com