कोदामेंढी :- मौदा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या धामणगाव येथे काल सोमवार 14 ऑक्टोबरला कामगार महिलांना सुरळीत किचन सेट व पेटी साहित्याचे वाटप करण्यात आले .यावेळी देवेंद्र गोडबोले मित्र परिवारातर्फे कामगार महिलांची जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था ,पेंडल ह्या सर्व गोष्टीची दखल घेत व्यवस्था करण्यात आली होती .त्यामुळे सर्व महिला कामगारांना कुठलीही अडचण न येता किचन सेट व साहित्य पेटीच वाटप सुरळीत करण्यात आले .
कामगार महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले यांचे आभार मानले आहे .याप्रसंगी आमदार टेकचंद सावरकर,त्यांचे पुत्र भूषण सावरकर यांचे मित्र परिवार व मौदा तालुक्यातील शेकडो कामगार वर्ग उपस्थित दिसले.