आपल्याकडील ‘ई-वेस्ट’ मनपात जमा करा, मनपा व सुरीटेक्स प्रा. लि. ची विशेष ‘ई-कचरा’ संकलन मोहीम 

नागपूर : ई-कचरा सध्या सर्वत्र समस्या ठरत आहे. नागरिकांच्या घरी वर्षानुवर्षे ई-कचरा तसाच पडलेला आहे, यापासून संभाव्य धोका त्यांना लक्षात येत नाही. नागपूर शहरातील ई-कच-याचे योग्यरित्या संकलन आणि व्यवस्थापन करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सुरीटेक्स प्रा. लि. द्वारे मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात मंगळवार १० व ११ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता दरम्यान विशेष ई- कचरा संकलन मोहीम राबविण्यात येत आहे.

नागरिकांनी आपल्या घरात वर्षानुवर्षे पडून राहिलेले बॅटरी, बंद पडलेले मोबाईल, चार्जर, रिमोट, हेडफोन व अन्य ईलेक्ट्रॉनिक वस्तू या केंद्रवर आणावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी केले आहे.

नागपूर शहरामध्ये निर्मित होणारा ई-कचऱ्याचे संकलन, वाहतूक व प्रक्रिया हे ई-कचरा व्यवस्थापन संशोधन नियम २०१८ अन्वये योग्यरीत्या लावण्याकरीता मानपद्वारे मे. सुरीटेक्स प्रा. लि, नागपूर यांना प्रायोगिक तत्वावर काम देण्यात आले आहे. याव्दारे शहरातील विविध भागातून ई- कचरा स्व:खर्चाने संकलीत करुन विल्हेवाट लावण्यात येणात आहे.

या केंद्रावर ई- कचरा सुरीटेक्स प्रा. लि. च्या वतीने १५ प्रति किलो या दराने स्वीकारले जाणार आहे. तरी नागपूर महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकांनी स्वतःच्या घरातील वापर केलेल्या/उपयोगी नसलेल्या ई-वेस्ट जसे नादुरुस्त ईलेक्ट्रॉनिक/ईलेक्ट्रीकल उपकरणे ईत्यादी वस्तू या विशेष संकलन केंद्रावर मे. सुरीटेक्स प्रा. लि. यांच्या प्रतिनिधींकडे जमा करावे आणि शहरामध्ये निर्माण होणाऱ्या ई-वेस्टची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सुनील तटकरे यांची भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा भाग झालाय ;भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार - अजित पवार

Tue Jan 10 , 2023
खासदार सुनिल तटकरे यांच्या ‘अभिनंदन… अभिवादन’ या पुस्तकाचे प्रकाशन… मुंबई :- सुनील तटकरे यांची ती भाषणे विधीमंडळाच्या दस्ताऐवजातून इतिहासाचा एक भाग झालेले आहे. त्यांच्या भाषणातून भावी पिढ्यांना त्याचा अभ्यास करता येणार आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या कार्याचे कौतुक केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांच्या ‘अभिनंदन… अभिवादन’ या पुस्तकाचे प्रकाशन आज यशवंतराव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com