शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार 95 हजार 682 पुस्तके मोफत

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 8 :- नवीन शैक्षणीक सत्राला नुकत्या काही दिवसांनी सुरुवात होणार असून .समग्र शिक्षा अभियानांतर्गत पाठयपुस्तके पुरविण्याकरिता शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.शाळेच्या पहिल्या दिवशी कामठी तालुक्यातील वर्ग 1 ते 8 वि पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 95 हजार 682 पुस्तका वाटप होणार आहेत.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यना सर्व मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत .यात पाठयपुस्तकाचाही समावेश आहे.येत्या काही दिवसानंतर नवीन शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे.या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून कामठी पंचायत समितीचे शिक्षण विभाग कामाला लागले आहे.कामठी तालुक्यातील 1 ते 8 वर्गापर्यंतच्या एकूण 15 हजार 694 विद्यार्थ्यांसाठी 95 हजार 682 पुस्तका कामठी पंचायत समिती च्या शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत .शाळेतील कोणताही विद्यार्थी पुस्तकापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण विभाग कसोशीचे प्रयत्न करीत आहेत यामाध्यमातून मुलांची उपस्थिती वाढविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे असे प्रयत्न केले जात आहेत .यानुसार मराठी व उर्दू माध्यमाच्या पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांचे विभाजीत केलेल्या चार संचानुसार उर्दू व मराठी माध्यमाच्या पहिल्या वर्गातील विदयार्थ्यांना माध्यम विषयाचे चार संच मिळणार आहेत. शाळा सुरू होताच नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती येणार असल्याने यावर्षी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होणार आहे.हे पुस्तक वाटप करण्यासाठी गटसाधन केंद्राचे शंकर कांबळे, दिनेश ठाकरे,मिलिंद मानकर, ब्रह्मानंद नागदेवें, गणेश सव्वालाखे आदी मोलाची भूमिका साकारत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

नेरी शिवारात दिवसाढवळ्या ट्रक चालकावर चाकूने हल्ला

Wed Jun 8 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी चाकूने वार करून 47 हजार रुपये लुटले कामठी ता प्र 8 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील एचपी पेट्रोल पंप समोरील नेरी शिवारात हैदराबाद वरून दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रक चालकास अज्ञात सहा आरोपींनी चाकूने वार करून गंभीर जखमी करून 47 हजार रुपये लुटल्याची घटना आज 8 जून ला दिवसाढवळ्या साडेबारा सुमारास घडली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com