पेाद्दार इंटरनॅश्नल स्कुलच्या विद्यार्थ्यांची म.न.पा.च्या बाजीराव साखरे ई- ग्रंथालयास भेट

नागपूर :-  आज दि. 11.11.2022 रोजी पोदार इंटरनॅश्नल स्कुल, गोधनी, नागपूर येथिल 175 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि शिक्षकानी नागपूर महानगरपालिका संचालित, बाजीराव साखरे ई- ग्रंथालय, आवळेबाबू चौक, लष्करीबाग येथे भेट दिली. नागपूर महानगरपालीका संचालीत, सार्वजनिक ग्रंथालय व अध्ययन कक्ष लहान मुलांकरीता, विद्यार्थीकरीता, नागरींकांकरीता कशी उपयुक्त ठरत आहे, याबाबत माहिती देण्यात आली. या प्रसंगी पुस्तके वाचनाचे महत्व विषद करण्यात आले तसेच विविध विषयावरील माहिती प्राप्त करून बौध्दीक क्षमता कशी वाढविता येईल व आपले शैक्षणिक तसेच स्पर्धात्मक जिवणात विद्यार्थ्याना सुजान नागरीक बनविण्याकरीता ग्रंथालय व अध्ययन कक्ष कशी उपयुक्त ठरते याचे महत्व समजवून सांगण्यात आले. ग्रंथालयाच्या इमारतीबाबत विद्यार्थी व शिक्षकानी विचारले असता. तत्कालीन आमदार आणि माजी पालकमत्री  डॉ. नितीनजी राऊत यांच्या प्रयत्नाने ग्रंथालयचे बांधकाम नागपुर सूधार प्रन्यास मार्फत करण्यात आले असून 2019 ला हि इमारत महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्यात आली. तसेच पालकमंत्री असताना इमारतीच्या गच्चीवरती 70 कि.वॅट चे सोलर जनरेटर युनिट लावून देण्यात आल्यामुळे ग्रंथालयाच्या व मनपाच्या वार्षिक विद्युत खर्चामध्ये मोठी बचत झालेली असल्याचे सांगण्यात आले. बाजीराव साखरे ई- ग्रंथालयाची भव्य इमारत पाहता सर्व विद्यार्थी व शिक्षक भारावुन गेलेत. ग्रंथालयातील सर्व विभाग जसे, अध्ययन कक्ष, कम्पुटर व क्युबिक्लस रूम, सेमिनार /वर्कशॉप हॉल, देण्यात येणारी इंटरनेट सुविधा याबाबत माहिती देण्यात आली, बरेशा विद्यार्थ्यानी स्पर्धापरीक्षा पास करून शासकीय नौकरी प्राप्त केलेली असल्याचे, सांगण्यात आले. 10 वी, 12 वी व पदवी प्राप्त केल्यानंतर उच्च शिक्षणाकरीता होणा-या प्रवेश परिक्षेची तयारी करून विद्यार्थ्यानी प्रवेश प्राप्त केल्याची माहिती देण्यात आली. या प्रसंगी गॅझेटेट ऑफिसर म्हणुन निवड झालेला हरीश बोरकर या विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. लहान मुलांकरीता स्वतंत्र ग्रंथालय व अध्ययन कक्षाची आवश्यकतेवर भर देण्यात आला

त्याच प्रमाणे नागपूर महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेन्द्र पुसेकर यांनी दि. 05/11/2022 रोजी बाजीराव साखरे ई- ग्रंथालयास सदिच्ध भेट देवून पाहणी केली व तेथील विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले. पोद्दार इंटरनॅश्नल स्कुल, तर्फे विद्यार्थी व शिक्षकांनी ग्रंथालयास भेट दिल्याबदल राजेन्द्र पुसेकर, शिक्षणाधिकारी, म.न.पा, नागपूर, व अल्का गावंडे, ग्रंथालय अधिक्षक, म.न.पा नागपूर यांनी पोदार इंटरनॅश्नल स्कुलच्या प्रिन्सिपल. डॉ. मिनी देशमुख, व वाईस प्रिन्सीपल. अनिल छाडी, यांचे आभार मानले. त्याच प्रमाणे ग्रंथालयास विद्यार्थ्यांची भेट घडवुन आनल्याबाबात विशेषतः फरीदा बेग (टुर इंचार्ज), वर्ग शिक्षीका सुषमा पाटिल, ज्योती कल्याणी, विक्टोरीया, अनिता मेश्राम, तसेच ग्रंथालयाती कर्मचारी, पियूष मेश्राम, स्वप्निल खोब्रागडे, मेघना रामटेके, सदाशिव मेश्राम व ग्रंथालयातील इतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे आभार सहा. ग्रंथपाल (प्र), विशाल शेवारे यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदार यादी अचूक होण्यास मतदारांनी सहकार्य करावे, जिल्हाधिकारी डॅा. विपिन इटनकर यांचे आवाहन

Thu Nov 10 , 2022
मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर उद्या जिल्ह्यात विशेष ग्रामसभेचे आयोजन नागपूर :- मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. पाच जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी, उद्या (10 नोव्हेंबर रोजी) नागपूर जिल्ह्यातील 569 ग्रामपंचातींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. या ग्रामसभेमध्ये प्रारूप मतदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!