संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- हरिहर नगर कांद्री येथील बहिण भाऊ घरून नेट कँफेत बँकिंगचे फार्म भरण्याकरिता जाताना नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील संताजी नगर कांद्री येथे मनसर कडुन कन्हान कडे जाणा-या दुचाकीने पायदळी विद्यार्थ्यास जोरदार धडक मारून गंभीर जख्मी केले.
सोमवार (दि.८) ला सायंकाळी ७ वाजता हरिहर नगर कांद्री येथील घरून बहिण शिवानी राधेश्याम भलावी वय २४ वर्ष ही १० वी मध्ये शिकणारा काका चा मुलगा मनिश शिवश्याम भलावी वय १६ वर्ष हे बहिण भाऊ घरून नेट कँफेत बँकिंगचे फार्म भरण्याकरिता जात असताना नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील संताजी नगर कांद्री येथे मनसर कडुन कन्हान कडे जाणा-या एनएस २०० प्लसर दुचाकी क्र एमएच ४०- सीएस १०६४ च्या चालकाने आपले वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालवुन पायदळी भाऊ मनिष ला जोरदार धडक मारल्याने तो रस्त्यावर खाली पडला. तसेच दुचाकी स्लिप होऊन दुचाकीवर स्वार दोघेही खाली पडले. पायदळी मनिष गंभीर जख्मी झाल्याने येणा-या जाणा-या लोकानी त्यास उचलुन जवळच असलेल्या खाजगी दवाखान्यात दाखल केले. परंतु त्याचे दोन्ही पाय फँकचर व गंभीर जख्मी झाल्याने घरच्यानी मनिष ला कामठी येथील खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल करून उपचार सुरू आहे. कन्हान पोलीसानी फिर्यादी बहिण शिवानी राधेश्याम भलावी च्या तक्रारीवरून आरोपी एनएस २०० प्लसर दुचाकी क्र एमएच ४०- सीएस १०६४ च्या चालका विरूध्द अप क्र १८/२०२४ कलम २७९, ३३७, ३३८ भादंवि, सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान वरिष्ट पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचे मार्गदर्शनात पो. हवा. नरेश श्रावनकर पुढील तपास करित आहे.