मी वादळाची लेक!; पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनी केले अभिवादन

बीड :- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काही वेळा आधी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन आहे. यावर पंकजा मुंडे बोलल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचं वादळी जीवन राहिलं आहे. मी वादळाची लेक आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. पंकजा मुंडे यांनी काही वेळाआधी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.

सध्याच्या राजकारणावर पंकजा म्हणाल्या…

आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत भावनिक असतो. यादिवशी मला राजकारण वगैरे काहीही दिसत नाही. राजकारण शून्य दिसतं. आज जे लोक आलेत. त्यांना मी काहीही दिलेलं नाही. तरी ते साहेबांवरच्या प्रेमापोटी आलेले आहेत. एकनाथ खडसे आलेत. ते बाबांचे सहकारी होते. तेही त्यांच्यावरील प्रेमापोटी आले आहेत, असं पंकजा म्हणाल्यात.

विनोद तावडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया विचारली असता. तावडे आमचे महामंत्री आहेत. ते बोलले असतील तर त्यावर मी काय बोलणार? नाथाभाऊ काय म्हणाले, तावडे काय म्हणाले, याचं उत्तर पंकजा मुंडे काय उत्तर देणार, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांनी आज एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माझं भाग्य आहे की माझा जन्म त्यांच्या पोटी झाला. त्याहूनही मला माझं भाग्य वाटतं ते म्हणजे त्यांच्या संघर्षाचा वारसा मला मिळाला. स्वाभिमानाने संघर्ष करत मुंडेसाहेब लढले. तसंच मीदेखील लढत राहील हे मी माझं कर्तव्य समजते. तेमी शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करत राहील, असं पंकजा मुंडे या व्हीडिओमध्ये म्हणाल्या आहे.

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात वटसावित्रीचा सण उत्साहात साजरा

Sat Jun 3 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भारत हा सण उत्सवांचा देश म्हणून ओळखला जातो. सृष्टीतील प्रत्येक सजीव, निर्जीव पूजनीय आहे. सारे सणवार ही एक प्रतिके आहेत. समाजात जे जे योग्य आहेत ते टिकले जावे आणि त्यातून एक सुदृढ समाज दीर्घकाळ टिकावा या मुख्य उद्देशाने स्त्रीयांचा खास मानला जाणारा वटसावित्री उत्सव कामठी तालुक्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. वट पौर्णिमेनिमित्त विवाहित […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com