सर्वेक्षणात हयगय करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

– उपायुक्त यांची केली कामाची प्रत्यक्ष पाहणी

– भाडेकरू यांचेदेखील सर्वेक्षण करणे आवश्यक

चंद्रपूर :- मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असुन उद्या २ फेब्रुवारी सर्वेक्षणाचा अंतिम दिवस आहे. या सर्वेक्षणात मनपा हद्दीत राहत असलेल्या प्रत्येक घरी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या काही प्रगणकांनी भाडेकरू राहत असलेल्या घरी सर्वेक्षण केले नसल्याचे पाहणीदरम्यान आढळुन आल्याने अश्या प्रगणकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत आहेत. 

२३ जानेवारीपासुन मराठा व खुल्या प्रवर्गातील घरांचे सर्वेक्षण मनपा हद्दीत केले जात आहे. अतिशय महत्वाचे कार्य असल्याने सर्वेक्षणात एकही घर सुटू न देण्याचे निर्देश मनपा प्रशासनाद्वारे देण्यात आले होते. त्याअनुषंगाने उपायुक्त तथा सहायक नोडल अधिकारी अशोक गराटे यांनी सर्वेक्षणाची प्रत्यक्ष पाहणी केली असता ज्या ज्या घरी भाडेकरू राहत आहे त्या घरांचे सर्वेक्षण काही भागात झाले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वास्तविक घरमालक व भाडेकरू दोघांचेही सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे याची नोंद घेऊन त्या भागातील प्रगणकांनी आपले कार्य पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत मनपाने दिले आहेत.

दरम्यान बाहेरगावी असल्याने,ठराविक वेळेत घरी उपलब्द्ध नसल्याने वा इतर काही कारणांनी ज्या कुटुंबांचे सर्वेक्षण १ फेब्रुवारीपर्यंत होऊ शकले नाही अशा कुटुंब प्रमुखांनी मनपा मुख्य झोन कार्यालय,क्षेत्रीय कर निरीक्षक अथवा मनपा मुख्य झोन कार्यालयात संपर्क करून आपले सर्वेक्षण करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

NewsToday24x7

Next Post

गाव चलो अभियानाच्या माध्यमातून भाजपा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Fri Feb 2 , 2024
नागपूर :- भारतीय जनता पार्टीतर्फे 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पक्षाचे सर्व केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत, अशी घोषणा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com