शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून रज्जत सुशिक्षीत बेरोजगार सेवा सहकारी संस्था आष्टी केंद्रावर कडक कारवाई

भंडारा :- आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2024-25 करिता धान खरेदी करीता शासनाचे BeAM पोर्टलवर ऑनलाईन नोंदणीकृत शेतकऱ्यांचा धान विक्री करता यावा, यासाठी जिल्ह्यातील 210 खरेदी केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदरील सर्व केंद्रावर शेतकरी नोंदणी आणि धान खरेदीचे कामकाज सुरू आहे. परंतु, जिल्ह्यातील काही सेंटर शेतकरी नोंदणी करिता पैसे घेत असल्याबाबत वृत्त प्रकाशित झाले होते. चंद्रकांत व्यंकटराव गजभिये रा. नाकाडोंगरी ता. तुमसर जि. भंडारा यांनी रज्जत सुशि. बेरो. सेवा. सह. संस्था मर्या आष्टी ता. तुमसर, जि. भंडारा या खरेदी केंद्राविरुध्द नोंदणी करिता पैसे घेत असल्याबाबत तक्रार जिल्हा पणन कार्यालयास दिली आहे. सदर तक्रारीस अनुसरून सहा. जिल्हा पणन पणन अधिकारी आर.पी. सोनवणे व कायदा विषयक सल्लागार राकेश शिंदेगणशूर यांनी संबंधित सेंटरची चौकशी करून जिल्हा पणन कार्यालयास अहवाल सादर केला.

सदर अहवालातील नमूद अनियमिततेबाबत जिल्हा पणन अधिकारी यांनी शासन निर्णयाच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून आणि मार्गदर्शक सुचनेतील तरतुदीनुसार, कडक धोरण अवलंबिले असून रज्जत सुशि. बेरो. सेवा. सह. संस्था मर्या आष्टी ता. तुमसर, जि. भंडारा या सेंटरचा आय.डी. बंद केला आहे.

तरी जिल्ह्यातील इतर सर्व धान खरेदी केंद्रांनी शासन निर्णयातील निर्देशीत अटी व शर्तीच्या अधिन राहूनच कामकाज करणे आहे. शेतकऱ्यांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य न करता शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आणि सोईसाठी धान खरेदीचे कामकाज करावे. धान खरेदी केंद्रावर कोणतीही अनियमितता झाल्यास संबंधित खरेदी केंद्रावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. याची कटाक्षाने नोंद घेण्याबाबत जिल्हा पणन अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रांना सुचित केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शालेय आरोग्य तालुका समन्वय समितीची बैठक

Sat Nov 30 , 2024
यवतमाळ :- राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शालेय आरोग्य तालुका समन्वय समितीची बैठक तहसील कार्यालय बाभूळगाव येथे घेण्यात आली. बैठकीमध्ये शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्याच्या वयानुसार आरोग्य, शिक्षण, आरोग्य प्रोत्साहन उपक्रम, आरोग्य तपासणी यास प्रोत्साहन तसेच आरोग्य, आरोग्याच्या संबधित माहितीचे दस्तऐवजीकरण आणि आपत्कालीन काळजीसाठी आवश्यक कौशल्य उदिष्टाचा समावेश करणे, कुपोषण आणि आजाराचे लवकर निदान करणे व त्यावर उपचार, शाळांमध्ये पिण्यायोग्य पाण्याचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!