यवतमाळ :- राष्ट्रीय किशोरवयीन स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत शालेय आरोग्य तालुका समन्वय समितीची बैठक तहसील कार्यालय बाभूळगाव येथे घेण्यात आली.
बैठकीमध्ये शालेय आरोग्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्याच्या वयानुसार आरोग्य, शिक्षण, आरोग्य प्रोत्साहन उपक्रम, आरोग्य तपासणी यास प्रोत्साहन तसेच आरोग्य, आरोग्याच्या संबधित माहितीचे दस्तऐवजीकरण आणि आपत्कालीन काळजीसाठी आवश्यक कौशल्य उदिष्टाचा समावेश करणे, कुपोषण आणि आजाराचे लवकर निदान करणे व त्यावर उपचार, शाळांमध्ये पिण्यायोग्य पाण्याचा वापर, आरोग्य वर्धनी दूताच्या माध्यमातून योग्य आणि ध्यान धारणेस प्रोत्साहन देणे, याबाबत चर्चा करण्यात आली.
मुलींना मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी प्रोत्साहन, मुलांसाठी आरोग्य वर्धन पोषण यावर संशोधन करण्यास प्रोत्साहन, लाभार्थी गट इयता ६ ते १२ पर्यंत शाळेतील विद्यार्थी शासकीय व शासकीय अनुदानित शाळेतील विद्यार्थी व आरोग्य वर्धनी संदेशवाहक शाळेतील विद्यार्थी प्रत्येक आठवड्यातील मंगळवार हा आरोग्य दिवस म्हणून निचित करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या.
घारफळ प्राथमिक केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये समन्वयक शिक्षक, १५ ते १९ वयोगटातील एक मुलगी व मुलगा यांची ५०० लोक संख्येवर नवीन निवड करणे इत्यादी विषयावर तहसीलदार मीरा पागोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.
बैठकीला गटविकास अधिकारी एस.बी.कोडापे, गटशिक्षणाधिकारी गणेश मैघने, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता फुलर, डॉ.पद्मजा वटे उपस्थित होते. यावेळी तालुका समितीची भूमिका व कार्ये, अंमलबजावणी प्रभावीपणे राबवण्यासंदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संघर्ष राठोड यांनी मार्गदर्शन केले.