नागपूर :- बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेकांना विविध ताण-तणावांना सामोरे जावे लागत आहे. कामाचे स्वरूप, बदलती कुटुंब रचना, समाजामध्ये वावरण्याचे बदलेले नियम व सोशल मीडिया या सर्वांचा परिणाम होत आहे.सततच्या ताण-तणावामुळे विविध शारीरिक आणि मानसिक त्रास उद्भवत आहे. वेळीच या गोष्टी आपण ओखळल्या आणि योग्य त्या उपायोजन केल्यास त्रास कमी होतो. वाढत्या ताण-तणावावर जाणीवपूर्वक नियंत्रण आणायला हवे.मानसिक ताण त्याचे लक्षणे काय असतात हे अनेकांना कळत नाही पर्यायी
झिरो माईल यूथ फौंडेशन,डोन्ट वरी ग्रुप व यंग अल्युमनी असोसिएशन ऑफ़ गवर्मेन्ट इंस्टिट्यूट ऑफ़ सायन्स तर्फे युवकांसाठी ‘मानसिक ताण व व्यवस्थापन’ सत्र ऑनलाईन गूगल मीट वर रविवार संध्याकाळी ७ वाजता ठेवण्यात आले आहे.यावर प्रसिद्ध मानसशास्त्र तज्ञ डॉ पुष्कर पांडे मार्गदर्शन करणार असून डॉ पांडे २००२ पासून प्रक्टिस करीत असून ताण,तनाव,मानसिक रोग यावर व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन व उपचार करतात.झिरो माईल यूथ फौंडेशन,डोन्ट वरी ग्रुप व यंग अल्युमनी असोसिएशन ऑफ़ गवर्मेन्ट इंस्टिट्यूट ऑफ़ सायन्स तर्फे आयोजित या महत्वाच्या सत्राला युवकांनी उपस्थित राहून आपले प्रश्न मांडून समाधान करवून घ्यावे असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे..सत्राला जुडण्याकरिता ९५४५७४५५८० यावर संपर्क साधावा.
@ फाईल फोटो