संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– जड वाहतुकिने तारसा रोड चौक, नविन उडाण पुल ते वाघधरे वाडी पर्यंत
– जड वाहतुकिने धुळीचे साम्राज्य, अपघातास निमंत्रण.
कन्हान :- राष्ट्रीय चारपदरी नागपुर बॉयपास महामार्ग सुरू झाल्या पासुन कन्हान शहरातील जड वाहतुकीस बंदी असुन सुध्दा बिनधास्त शहरातुन कोळसा, रेती, गिट्टी, राख, सल्फेट ची दहा चाकी ते वीस चाकी ट्रकने जड व ओव्हर लोड वाहतुक सुरू असल्याने शहरातील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरत असुन तारसा रोड वरील रेल्वे उडाण पुल सुरू झाल्यापासुन जड वाहतुकीत वाढ होऊन अपघात वाढुन मोठया अपघाताची दाट शक्यता वाढल्याने कन्हान शहरातुन जड वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी. अशी मागणी भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था कन्हान अध्यक्ष चिंटु वाकुडकर यांचे नेतुत्वात नगर प्रशासन व पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन करण्यात आली आहे.
नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्र ४४ हा कन्हान शहरातुन जात असुन दोन्ही बाजुला भरगच्छ लोकवस्ती आहे. शहराच्या मधोमध असलेल्या तारसा रोड चौकातुन तारसा कडे जाणा-या रस्त्या वर रेल्वेने उडाण पुल मागील महिन्यातच सुरू केल्याने जड वाहतुक वाढु लागली आहे. राष्ट्रीय चारपदरी नाग पुर बॉयपास महामार्ग सुरू झाल्यापासुन कन्हान शह रातील जड वाहतुकीस बंदी असुन सुध्दा टोल नाका वाचविण्या करिता बिनधास्त शहरातुन कोळसा, रेती, गिट्टी, राख, सल्फेट ची दहा चाकी ते वीस चाकी पर्यंत च्या ट्रकने वाहतुक सुरू असल्याने शहरातील रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरत असुन जड वाहतुकीची वाढ होऊन अपघात वाढुन मोठया अपघाताची दाट शक्यता वाढु लागली आहे.
कन्हान शहरात १२ शाळा, चार कनिष्ट महाविद्या लय असल्याने शाळा, कनिष्ट महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांची दिवसा आणि ग्रामिण गावातील विद्यार्थी व नागरिकांची चांगलीच वर्दळ असते. तारसा रोड चे व्यवस्थित काम पुर्ण झाले नसुन रेल्वे उडाण पुलासामोर १) आंनद नगर रस्ता, २) गहुहिवरा-चाचेर मार्ग, ३) राधाकृष्ण नगर रस्ता, ४) वाघधरे वाडी, तारसा कडे उडाण पुल ५) तुकाराम नगर रस्ता, ६) रेल्वे माल धक्का रोड, ७) पांधन रोड, ८) तारसा रोड चौक कडे जाणारा अशा आठ रस्ते जोडणारा अष्ट चौक येथे तयार झाल्याने सुध्दा अपघातास निमंत्रण देत आहे. पायदळी व दुचाकी वाहन चालकास हा रस्ता ओलांडणे भंयकर त्रास दायक ठरत आहे. शहरात आठवडी व गुजरी बाजारा करिता स्थायी जागा नसल्याने महामा र्ग, तारसा रोड, पांधन रोड वरच गुजरी व आठवडी बाजार भरत असल्याने नेहमी वाहतुक खोंळबत अस ते. या रस्त्या लगत रहिवासी, दुकानदार या जड वाहतुकीच्या धुळी प्रदुर्शनाने त्रस्त असुन आरोग्यावर दुष्य परिणाम होत विविध आजाराला बळी पडत आहे. अश्या विविध समस्यानी येथील नागरिक भंयकर त्रस्त असल्याने संबधित अधिकारी व विभागाने प्रत्यक्ष पाह णी करून योग्य ती कार्यवाही करून कन्हान शहरातील जड वाहतुक त्वरित बंद करण्यात यावी. अशी मागणी कन्हान-पिपरी नगरपरिषद मुख्याधिकारी राऊत, नगराध्यक्षा आष्टणकर, कन्हान वरिष्ठ पोलिस निरिक्षक सार्थक नेहेते हयाना निवेदन देऊन मागणी केली आहे. याप्रसंगी शिष्टमंडळात भुमिपुत्र बहुउद्देशिय संस्था कन्हान अध्यक्ष चिंटु वाकुडकर, उपाध्यक्ष समशेर पुरवेले, सचिव रजनिश मेश्राम, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, प्रशांत भोयर, पी एम मानकर, चंद्रभान कुंभलकर, ऋृषी कोचे, संगित भारती सह नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.