संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रविदास नगर जवळील खुल्या मैदानात असलेल्या अतिष यादव यांच्या गाईच्या गोठ्यात बांधून असलेले चार गायी व एक सांड असा एकूण 98 हजार रुपये किमतीचे 5 गोवंश जनावरे अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज सकाळी 6 वाजता उघडकीस आली.यासंदर्भात फिर्यादी अतिष यादव वय 46 वर्षे रा गवळीपूरा कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध भादवी कलम 379 अनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.