संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी, ता.२५ : येथील छत्रपती नगरात राहणाऱ्या माजी सैनिक ४५ वर्षीय संजय शालीकराम गजभिये याने आपल्या राहत्या घरी फिनाईल पिऊन आत्महत्या केली तर संजय सोबत राहणाऱ्या ३५ वर्षीय कविता वानखेडे हिने विषारी पावडर खाऊन माहेरी काटोल येथे आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मृतक संजयचे पहिले लग्न कामठी येथील एका अभियांत्रिकीची बहीण माधुरी नावाच्या मुलीसोबत झाले होते तर मृतक कविता हिचे लग्न पांढुरणा येथे दिलीप वानखेडे सोबत झाले होते संजयची पत्नी माधुरी हिचा मृत्यू झाला तर कविता हीचा पती दिलीप वानखेडे चा अपघाती मृत्यू झाल्याने दोघेही लिव्ह & रिलेशन शिपमध्ये कामठीत राहत होते .मृतक संजयला पहिल्या पत्नी कडून मुलगी साक्षी (१८),तर मुलगा वैभव (१७)आहेत मंगळवारला संजय व कविता तुमसर येथे लग्नाला सोबत गेले असता कोणत्यातरी अज्ञात कारणावरून दोघात कडाक्याचे भांडन होऊन दोघात मारपिट झाल्याने कविता माहेरी काटोल ला तर संजय हा कामठीला पोहोचला बुधवारला सकाळी कविता हिने सकाळी आठ वाजता दरम्यान विषारी पावडर खाऊन आत्महत्तेचा प्रयत्न केला परिवारातील लोकांनी तिला उपचाराकरिता काटोल येथील ग्रामीण रुग्णल्यात उपचाराकरिता प्राथमिक उपचारानंतर कविताला नागपूरला रेफर करण्यात आले नागपूरला उपचार दरम्यान मृत्यू झाला याची माहीती कवितांच्या भावानी फोन वर संजयला दिली. मृत्यू ची माहिती मिळताच संजय ने ९ ते १० च्या दरम्यान आपल्या राहत्या घरी फिनाईल सेवन केल्याने त्याला उपचाराकरिता स्थानिक चौधरी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले असता अखेर रात्री १० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर या अज्ञात कारणावरून दोघेही पती पत्नीने अज्ञात कारणावरून झालेल्या भांडणात जगाचा शेवटचा निरोप घेतला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू ची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.