केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विविध मांगण्यांसाठी निवेदने

– जनसंपर्क कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना (रविवारी) जनसंपर्क कार्यक्रमात नागरिकांनी विविध मागण्यांची निवेदने देतानाच त्यांच्यापुढे कृषी, सौरऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमधील नाविन्यपूर्ण कल्पनाही मांडल्या.

खामला येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांनी निवेदनांसह मोठी गर्दी केली. सकाळपासून मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यालयात उपस्थित होते. यामध्ये दिव्यांगांचाही समावेश होता. काही दिव्यांगांनी नोकरीसाठी तर काहींनी कृत्रीम पायाच्या मागणीसाठी निवेदन दिले. नवीन रस्त्यांसाठी, अनुकंपा तत्वावरील नोकऱ्यांसाठी, आरोग्य क्षेत्रातील मागण्यांसाठी नागरिकांनी निवेदने दिली. यावेळी ना. गडकरी यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. व्यक्तिगत पातळीवरील प्रश्नांसह संस्था-संघटना, शहराच्या व खेड्यापाड्यांमधील विषयांवर नागरिकांनी ना. गडकरी यांच्यासोबत चर्चा केली.

दिव्यांग बांधव-भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिक सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात येत असलेल्या अडचणीचा विषय घेऊन आले. विविध मागण्यांची निवेदने स्वीकारून मंत्री महोदयांनी संबंधित विभागांकडे या संदर्भात पाठपुरावा करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यासोबतच रेल्वे, महामार्ग, कृषी, सहकार, पर्यावरण, पाणीपुरवठा, ऑटोमोबाईल अशा विविध क्षेत्र व विभागांशी संबंधित विषय ना. गडकरी यांनी ऐकून घेतले. जागेच्या प्रश्नासंदर्भातील निवेदनेही त्यांनी स्वीकारली. सामाजिक, साहित्यिक, धार्मिक तसेच अध्यात्माशी संबंधित संस्थांनीही ना. गडकरी यांच्याकडे आपल्या मागण्या मांडल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गोसेवाडी सरकारी डेपो में हो रही लापरवाही

Mon Jun 19 , 2023
सरकारी कर्मचारी डेपो में न होने से सेकड्रो ट्रांसफरो की खडी रह रही गाड़िया सावनेर :- सावनेर तहसील के गोसेवाड्री सरकारी डेपो में रेती 12/06/2023 रेती से आधार कार्ड ऑनलाइन बुकिंग डेपो से रेती देना चालू हुआ है।परंतु दो दिनों से सरकारी डेपो से ले जा रहे ट्रांसपोर्ट मालिको का कहना है,की गोसेवाड्री सरकारी डेपो में 15/06/2023 रोज को डेपो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!