नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी
मोहाडी : केंद्र सरकारने चालू केलेली अग्निपथ योजना तात्काळ मागे घेण्याकरिता आज मोहाडी तहसील कार्यालय राष्ट्रवादी युवक तर्फे मोर्चा काढण्यात आला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हुकूमशाही पद्धतीने सैन्य भरती करिता अग्निपथ योजना सुरू केली ती तात्काळ थांबविण्यासाठी तहसील कार्यालयात राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फेबमोर्चा काढण्यात आला. ही अग्निपथ योजना युवकांसाठी त्यांचा भविष्य बरबाद करणारी कारणीभूत ठरेल.१७-१८ वर्षाच्या युवकांना सैन्यात घ्यायचं आणि सैनिकी प्रशिक्षण देऊन २२व्या वर्षी हातात दहा वीस लाख रुपये देऊन घरी बसवायचं. शिकायच्या वयात नोकरी द्यायची ती सुद्धा फक्त चारच वर्ष. परंतु २२व्या वर्षी रिटायर्ड झाल्यानंतर या युवकांच्या भविष्याचं काय?रिटायर झाल्यानंतर दहावी-बारावीची डिग्री आणि सेवानिवृत्तीचे काही पैसे सोडले तर या युवकांच्या हातात काहीच राहणार नाही. अर्धवट शिक्षणामुळे भविष्यात नोकरी मिळेल याची शाश्वती नसेल. शिक्षण आणि भविष्यात नोकरी नसल्यामुळे युवकांची दिशाभूल होईल त्यामुळे तात्काळ योजना रद्द करावी अशा मागणीचे निवेदन
मोहाडी तहसीदार यांच्या मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला.युवक राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र मेहर, युवक शहराध्यक्ष अनुप थोटे,पंचायत समिती सभापती रितेश वासनिक,पंचायत समिती सदस्य बाना सव्वालाखे, जिल्हा महासचिव विजय पारधी, किरण अतकरी, नगरपंचायत सभापती सचिन गायधने,पिंटू तरारे,डी एन बोरकर, सुनील बानासुरे,प्रवीण हेडाऊ,कलस तरारे, नकुस मेहर,अनिल शिवरकर, आशिष पडोळे, मदन गडरीये, देवकांत पराते, चुनीलाल माटे,हेमराज देवगडे, विजय बारई, पवन गभणे,निलेश निमजे,भोला कुथे, उमेश दमाहे,दुर्योधन बोंद्रे,अजय शेंडे,बादल गायधने,गुड्डू बोंद्रे, सुमित पाटील, दुर्गेश उके, अमोल मते, अनमोल साखरे, रामचंद्र भोयर, गुलाब शेंडे,मोनू बर्वे,संतोष पचघरे, विशाल मानकर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते