रामटेक :श्री.नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक येथे राज्यशास्त्र, इतिहास तसेच राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त दोन दिवसीय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचे उद्घाटन डाॅ.ओमप्रकाश आष्टनकर यांनीं केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे या होत्या. डॉ. ओमप्रकाश आष्टनकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की
अलीकडे भारतात सर्व सामान्यांची लोकतान्त्रिक मुले पायदळी तुडवली जातील अशा वेळी विद्यार्थ्यांनी समोर येऊन संविधानिक मूल्य टिकवून ठेवण्याची गरज आहे. भारतात अलीकडे भांडवलवादी प्रवृत्ती बळावत चालली आहे लोकशाहीचे अवमूल्यन होत आहे अशा काळात लोकशाहीच्या मजबुतीसाठी सामान्य विद्यार्थ्यांनी जागरूक नागरिक होण्याची गरज आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता टक्कामोरे उपस्थित होत्या. महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त संविधानावर आधारीत परीक्षा घेण्यात आली.यात महाविद्यालयातील व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.श्रीकांत भोवते यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनील कठाने यांनी केले.आभारप्रदर्शन प्रा. अमरीश ठाकरे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील डॉ बाळासाहेब लाड, प्रा. स्वप्नील मनघे प्रा. नरेश आंबीलकर उपस्थित होते.