बहुजन समाज पार्टीचे निवेदन

नागपूर :- बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्ह्याच्या वतीने नागपूर शहरात मुसळधार पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाई बद्दल आर्थिक मदत नागरिकांना मिळावी.यासाठी नागपूर जिल्हाधिकारी विपिन जयस्वाल व मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.

शनिवार 23 /9/2023 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार पावसाने नागपूर शहर व ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोरगरीब ,कामगार विद्यार्थी हातठेलेवाले,रिक्षा चालक, विद्यार्थी व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

या अविकारी पावसामुळे नागपूर शहरातील अनेक अशा वस्त्यांमध्ये घराघरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे,या हानी मध्ये दक्षिण पश्चिम क्षेत्रातील,रामबाग इमामवाडा, दक्षिण नागपूरतील कौशल्य नगर, सावित्रीबाई फुले नगर रामटेके नगर,उत्तर नागपूर, आदर्श नगर पंचशील नगर, समता नगर ,संघर्ष नगर आदिवासी कॉलनी ,भदंत कौशल्य नगर पिवळी नदी,पश्चिम नागपूर क्षेत्रातील आंबेडकर कॉलनी, सुरेंद्रगड ,हिल टॉप आदिवासी कॉलनी, गड्डी गोदाम, पांढराबॉडी रामनगर ,शंकरनगर झोपडपट्टी, वाडी हिंगणा, दिगडोह,रामगिरी,अशा संपूर्ण शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले आहे.

विशेष म्हणजे घराघरांमध्ये पाणी शिरल्यामुळे विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तके महत्त्वाचे कागदपत्रे अन्नधान्य यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेतकऱ्यांचे पीक पाण्यामुळे खराब झाले आहे.

अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पीडित ग्रस्त लोकांकडे न जाता फक्त काही सीमित वस्त्यांमध्ये भ्रमण करून त्यांनी आपला अहवाल पत्रकारांना दिला आणि तुटपुंजी मदत जाहीर केली. जेव्हा की ही मदत नुकसानीपेक्षा फार कमी मदत आहे.

या नुकसानीमध्ये जवळपास दहा ते पंधरा हजाराहून लोकांचे नुकसान झालेले आहे आणि जवळपास इतकेच लोक प्रभावीत सुद्धा झालेले आहेत.

आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे सरकारने निश्चित असे धनराशी देऊन विशेष असा अर्थिक पॅकेज तयार करून त्यांना तातडीने मदत करावी, बसपाच्या या मागणीमध्ये प्रत्येक पिढीत परिवाराला एक लाखाची मदत द्यावी व ज्या दुकानदारांचे व्यवसायिकाचे नुकसान झालेले आहे त्यांना सुद्धा प्रत्येकी 50 50 हजार रुपयाची मदत जाहीर करावी. जर ही मदत सरकारने प्रशासनाने पूर्ण केली नाही तर येणाऱ्या काही दिवसात बहुजन समाज पार्टी जनसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करणार. यानिवेदनामध्ये ओपुल तामगाडगे यांच्या नेतृत्वात तसेच प्रदेशचे महासचिव नागोराव जयकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यामध्ये बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक योगेश लांजेवार अविनाश नारनवरे, उपाध्यक्ष उमेश मेश्राम शहर सचिव धनराज हाडके, बसपाच्या महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखा डोंगरे वर्षा वाघमारे, उत्तरं विधानसभ अध्यक्ष जगदीश गजभिये, उत्तर नागपूर उपाध्यक्ष अनवर अंसारी, अध्यक्ष जितेंद्र पाटील, सचिव राजरत्न कांबळे, उत्तरं मनोज सांगोडे, सावनेर विधानसभा चे प्रभारी सावलदास गजभिये, माजी बसपा पक्ष नेता गौतम पाटील, पश्चिम विधानसभाचे अध्यक्ष भास्कर कांबळे महासचिव अंकित थूल,पश्चिम विधानसभाचे उपाध्यक्ष एड. विरेस वरखडे, शहर सदस्य हेमंत बोरकर, पंकज ठवरे, कौशल्य नगरच्या वॉर्ड अध्यक्ष विमल इंगळे, पश्चिम विधानसभा चे प्रभारी मनोज गजभिये, बसपाचे बुद्धम, वरिष्ठ नेते जनार्दन मेंढे, तपेश पाटील सुबोध साखरे, विनोद नारनवरे, अनिल मेश्राम, आदेश रामटेके पंकज नाखले, रोहन गावंडे, त्याच प्रमाणे पीडित महिला मोठ्या प्रमाणात या निवेदनात सामील होता यामध्ये नालंदा मेश्राम माधुरी टेंबेकर मनीषा डोंबारे शिल्पा घरडे स्वाती कुमालकर शितल चौरे वनश्री पिल्लेवान सुदेश ना कांबळे शिल्पा डंबारे पूनम फुललेले पूनम मेश्राम मंदाकिनी साधना ठाकरे लता काळे शिल्पा शेंडे इत्यादी असंख्य मोठ्या प्रमाणात महिलावर्ग या निवेदनामध्ये सामील होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Tue Sep 26 , 2023
मुंबई :- महाराष्ट्राच्या सागरी प्रदेशातील सुरक्षा उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडून भारतीय तटरक्षक दलासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांच्यासह महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत बाडकर यांच्यासह या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com