नागपूर,दि. 07 : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाअंतर्गत उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचे द्वारा विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड, मानकापूर येथे ऑनलाईन आभासी पद्धतीने राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी कलाकार व स्पर्धकांना शुभ संदेश देऊन केला.
याप्रसंगी राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी सिद्धार्थ रॉय, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी श्री.विर, क्रीडा व युवक सेवाचे उपसंचालक शेखर पाटील व जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड उपस्थित होते.
राज्यस्तरीय महोत्सवामध्ये लोकनृत्य प्रकारात अमरावती, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर या विभागातील 6 संघानी तसेच लोकगीत या कला प्रकारामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, लातुर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या विभागातील 8 संघांनी ऑनलाईन सहभाग घेतला.
लोकनृत्य प्रकारात मथुरादास मोहता विज्ञान महाविद्यालय, नागपूर यांना प्रथम तर सि.के. ठाकुर कॉलेज, न्यु पनवेल, मुंबई – द्वितीय आणि झेनिथ इंडीया फाऊंडेशन, अमरावतीला तृतीय तसेच लोकगीत प्रकारात प्रथम – सह्यांद्री शिक्षण सेवा मंडळ, रायगड, मुंबई, द्वितीय – श्री. घोडगेरीसिद्ध ओविकार मंडळ, तळंदगे, जि. कोल्हापूर आणि तृतीय – एस.व्ही.के.टी. आर्ट, सायन्स व कॉमर्स कॉलेज, देवळाली कॅम्प, नाशिक यांना मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर पाटील तर आभार प्रदर्शन अविनाश पुंड यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीमती माया दुबळे यांनी केले.