नागपूर :- १२ जानेवारीला दुपारी १२.३० वाजता रविभवन येथील सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहेत. या बैठकीला हिंदू बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.नरेंद्र भोंडेकर, विधानपरिषद सदस्य कृपाल तुमाने, अ.भा.सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष चरणसिंह टाक, महासंघाचे संस्थापक भैयासाहेब बिघाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक संपन्न होत आहे. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेल्या १३ टक्के आरक्षणाचा लाभ हिंदू मागासवर्गीय समाजाला होत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती प्रवर्गाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा अधिकार राज्याला दिला आहे. यासाठी राज्य शासनाने एक समिती गठित केली आहे. मात्र यात कोणत्याही मागासवर्गीय समाजाचा प्रतिनिधी न घेतल्यामुळे ती समिती काय अहवाल देईल याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.हिंदू मागासवर्गीय समाजाच्या अशाच इतरही मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्या मागण्या मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येतील. बैठकीला लहुजी शक्तिसेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कसबे, लहुजी सेना अध्यक्ष शंकरराव तडाखे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक मच्छिंद्र सकटे, शंकरराव वानखेडे, विशाल लारोकर, प्रदीप बोरकर, भारती कांबळे, रमेश जाद्रीमल, सूर्यकांत गवळी, रविराज खरात, रघुवीर तुरेकर, अजित केसराईकर, राजू अहिरे, प्रा.डॉ.दिगंबर नेटके आदी शंभरावर पदाधिकारी राज्यभरातून उपस्थित राहतील.
हिंदू बहुजन महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक रविवारी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com