नागपूर :-महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, नागपूर येथे रविवार दि 25 डिसेंबर 2022 ला सर्व शाखीय माळी समाजाचा राज्यस्तरीय भव्य उपवर वर – वधू परिचय मेळावा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार तसेच प्रमुख वक्ता म्हणून प्रशांत वावगे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महाज्योती, नागपूर, प्रमुख उपस्थिती डॉ राजूभाऊ जाधव, अध्यक्ष, महात्मा फुले सेवा संघ, महाराष्ट्र यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात केली. मान्यवरांचा हस्ते ” योगायोग, या परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. या पुस्तिकामध्ये 1800 उपवर युवक युवतीची माहिती उपलब्ध आहे. कार्यक्रमात 250 युवक- युवतीनी परिचय दिला. माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांनी शाखा वाद सोडून सर्व समाजांनी एकत्र यावे, शुभ कार्यक्रमात जात असतांना हार तुरे, पुष्पगुछ ऐवजी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर महापुरुषांची जीवन चरित्र पुस्तके भेट दयावी, हुंडा पद्धती ला विरोध करावा, व समाजाने एकसंघ राहावे ही काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना महात्मा फुले उपवर वर वधू परिचय मेळावा चे प्रमुख संयोजक सुनील चिमोटे यांनी केले तर सूत्रसंचालन अर्चना तिजारे, सहसयोजक शरद चांदोरे, व आभार प्रदर्शन सह संयोजक अजय गाडगे यांनी मानले.
याप्रसंगी संस्थेचे कार्याधक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाबराव चिचाटे, सरचिटणीस रवींद्र अंबाडकर, सहचिटनीस रमेश राऊत, कोषाध्यक्ष प्रा मुकेश घोळसे, संचालक कृष्णा महादुरे, राजेंद्र पाटील,मोहित श्रीखंडे, डॉ प्रा अभिजीत पोतले, नंदू कन्हेर, देवेंद्र काटे, संचालिका शोभा लेकुरवाळे, डॉ. अलका झाडें, माधुरी गणोरकर व मोठया प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचा यशस्वीतेकरिता सहसंयोजक धनराज फरकाडे,राजू गाडगे व सहकारी मंडळीनी सहकार्य केले.