यवतमाळ :- क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेत क्रीडा विषयक प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण होण्याच्या उद्देशाने दरवर्षी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचे नुकतेच उद्गाटन झाले.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादोजी कोंडदेव पुरस्कारार्थी तसेच शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी डॉक्टर उल्हास नंदुरकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून बाबाजी दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य क्षीरसागर व जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड उपस्थित होते. बॉक्सिंगचे प्रशिक्षक मिश्रा, फुटबॉल प्रशिक्षक प्रितम शहाडे व अभिजीत पवार, हॅन्डबॉल प्रशिक्षक निखीलेश बुटले, मैदानी खेळाचे प्रशिक्षक सागर रेकवार, कोमलसिंग बघेल हे उपस्थित होते. तसेच जवळपास 150 खेळाडू उपस्थित होते.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी प्रास्ताविकपर भाषणामध्ये विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांची माहिती दिली. बाबाजी दाते शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेंद्र क्षिरसागर यांनी खेळाडूंना या काळात मिळत असलेल्या सोयी सुविधांबद्दल त्यांचे मत विषद केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे किती अमुल्य योगदान आहे, याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात उल्हास नंदुरकर यांनी कोणत्याही खेळामध्ये आपल्याला उच्चतम प्रगती करावयाची असेल तर त्याकरिता त्या खेळाडूने पुर्णपणे स्वतःला झोकून दिले पाहिजे. त्याकरिता कितीही कठीण परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचलन क्रीडा अधिकारी चैताली राऊत यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी सचिन हरणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता जिल्हा क्रीडा कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक कल्याणी रत्नपारखी, रविंद्र पाळेकर, अभय धोबे, मनिष डोळसकर, योगेश देशमातुरे, पांडुरंग जाधव व सायली राठोड यांनी परिश्रम घेतले.