क्रिडा महोत्सवातुन चांगले खेळाडु घडतात..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

धर्मराज प्राथमिक शाळेत चार दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन.  

कन्हान : – शालेय जिवनात क्रिडा खेळाचे महत्त्व असु न यातुनच चांगले खेळाडु निर्माण होतात. धर्मराज शाळेने क्रिडा महोत्सवाचे आयोजन करून विद्यार्थ्यां च्या कलागुणांना वाव दिला असल्याचे प्रतिपादन उद्घाटक  धनंजय कापसीकर यांनी केले.

धर्मराज प्राथमिक शाळेत (दि.७) डिसेंबर पासुन चार दिवसीय क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन शाळा व्यवस्थाप न समितीचे अध्यक्ष व पत्रकार  धनंजय कापसीकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्या ध्यापक  खिमेश बढिये तर प्रमुख पाहुणे म्हणुन पर्य वेक्षक सुरेंद्र मेश्राम उपस्थित होते. या चार दिवसी य क्रिडा महोत्सवात कबड्डी, लंगडी, रनिंग, चमचा गोटी, बेडुक उड्या, बॅलन्सींग या सारखे विविध खेळ होणार आहे. या महोत्सवातुन विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळेल, असा आशा वाद मुख्याध्यापक  खिमेश बढिये यांनी व्यक्त केला . क्रिडा महोत्सवाचे नियोजन अमीत मेंघरे व  हर्षकला चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. कार्य क्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन भिमराव शिंदे मेश्राम  यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी  अमीत मेंघरे, हर्षकला चौधरी,  भिमराव शिंदे मेश्राम,  किशोर जिभकाटे,  अर्पणा बावनकुळे, शारदा समरीत, सौ चित्रलेखा धानफोले,  दिनेश ढगे,  सतीश राऊत,  पूजा धांडे,  कांचन बावन कुळे, सौ वैशाली कोहळे, सौ सुनीता मनगटे, सौ संगीता बर्वे आदी सहकार्य करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आपल्या गावाची मतदान यादी मोबाईलवर पहा..

Thu Dec 8 , 2022
महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक 2022 सरकारमार्फत गावानुसार नवीन मतदान यादी ऑनलाईन जाहीर करण्यात आली आहे. आज आपण या लेखांमध्ये आपल्या गावची नवीन मतदान यादी मोबाईल वरती कशी पाहायची ? याविषयी माहिती पाहणार आहोत. मतदान कार्ड हे महत्वाचे डॉक्युमेंट आहे. कधी-कधी असे होते की, आपले मतदान कार्ड कुठेतरी हरवते किंवा फाटून जाते. मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करण्याच्या सूचना शासनाकडून या अगोदरच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!