कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात मोफत रोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- महाराष्ट्शासन आरोग्य सेवा यांच्या नेतृत्वाखाली कामठी च्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आयुष्यमान भव:अभियान तथा ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे ‘अंतर्गत आयोजित मोफत रोग निदान शिबीर व उपचार शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या शिबिरात अंतर्गत एकूण 985 लाभार्थ्यांचे मोफत वैद्यकिय तपासणी करण्यात आले त्यातील 18 वर्षावरील 172 लाभार्थ्यावर तपासणी करून औषधोपचार करण्यात आला.

हे आरोग्य शिबीर वैद्यकिय अधिक्षिका डॉ नयना दुफारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी सह हॉस्पिटल चे तज्ञ डॉ अमोल रघुवंशी व त्यांच्या चमूने विशेष आरोग्य सेवा पुरविली. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी विशेष सेवा पुरविली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Nagpur takes the lead with India’s first city-specific Zero Carbon plan for its buildings

Sat Mar 9 , 2024
– Aligning with both National and Subnational policies, Nagpur targets comprehensive building efficiency and decarbonisation in pioneering city-wide initiative.  Nagpur :- Nagpur city has embarked on an ambitious journey towards sustainable development by launching the Zero Carbon Buildings Action Plan (ZCBAP). It sets a precedent for the state of Maharashtra, and is also a pioneering effort to boost building sector […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com