रियल इस्टेट सलाहकार वेल्फेअर असोसिएशनची पाचव्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर :- भारतीय रियल इस्टेट सलाहकार वेल्फेअर असोसिएशनची पाचवी बैठक नुकतीच ४ अप्रैल रोजी विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या हाॅलमध्ये संपन्न झाली. लागोपाठ एकाहून एक सरस अश्या या सभेला हाॅल मध्ये कडक ऊन असुन व चुनावी माहौल असुन देखील खच्च भरुन नविन सलाहकार उपस्थित होते. व वेगळे काय या उत्सुकतेने पहिल्या, दुस-या मिटिंगमध्ये जे सलाहकार उपस्थित होते त्यांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. यावेळी मंचावर संघटनेचे सचिव मोहन बळवाईक, कार्यकारी अध्यक्ष के.एम. सुरडकर, संस्थापक अध्यक्ष राजविरसिंह व प्रमुख अतिथी म्हणून रिटायर्ड डिस्ट्रिक्ट एन्ड सेशन जज भारत चंद्रिकापुरे उपस्थित होते. सचिव मोहन बळवाईक यांनी आपल्या ऊद्बोधनात सलाहकारांना ऊत्साहीत करित भविष्यात अनेक योजना ही संस्था राबविणार असल्याचे सांगितले. संस्थेचे लक्ष हे फक्त वेल्फेअर नसुन सलाहकारांची व्यक्तिगत वृध्दी, आर्थिक वृद्धी, प्रशिक्षण व समृद्ध जीवन असा मुलमंत्र दिला. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष के. एम.सुरडकर यांनी आपल्या ऊद्बोधनात विजिट संबंधी, फाईनल डिल, कमीशन आदि. संबधी योग्य दस्तावेजीकरण सोबतच प्रत्येक सलाहकार स्वतंत्र रुपाने आपला वृध्दिंगत व्यवसाय करुन मार्केटिंग कंपन्या, विकासक, बिल्डर्स व सलाहकारांच्या दैनंदिन धोखाधडी संबधी घटना व फसवणुकीपासून निवृत्त होऊन शकतो असे नमूद केले. विशेष करुन संस्थेला लाभलेले प्रमुख अतिथी हे रिटायर्ड डिस्ट्रिक्ट एन्ड सेशन जज भारत चंद्रिकापुरे ज्यांचा परिचयच त्यांची व संस्थेची भक्कम उंची दर्शविणारा आहे. त्यांनी चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, सातारा, धुलिया, पुणे, मुंबई येथे २४ वर्षे डिस्ट्रिक्ट एन्ड सेशन जज म्हणून काम केले व नागपूर येथून वर्ष २०१५ साली ते रिटायर्ड झाले. व वर्तमानात ते हायकोर्टात प्रॅक्टिस करीत आहेत. हायकोर्ट ऑफ महाराष्ट्राद्वारे त्यांची आर्बिट्ररी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजेच कोणत्याही योजनेवर किंवा विचारावर न आधारलेला आणि स्वैर, स्वेच्छा, मनमानी, स्वच्छंदी निर्णय असलेला स्वतंत्र कानूनी सलाहकार आणि सर्वात महत्वाचे ते भारतीय रियल ईस्टेट सलाहकार वेल्फेयर असोसिएशन नागपूर चे लिगल एडवाईजर पण आहेत. त्यांनी आपल्या ऊद्बोधनपर भाषणात सर्व सलाहकारांना एक मोठ्ठा दिलासा दिला की कुठल्याही कानूनी दावपेंचा मध्ये ते आमच्या सोबत असतील. महारेरा अधिनियम येण्याच्या आधीच ते निवृत्त झाले असले तरी त्यांनी “महारेरा” कानूनच्या ९२ कलमांचा अभ्यास करुन सलाहकारांच्या सर्व अडचणी सोडविण्याचा दिलासा दिला. कायदे संबंधित सलाहकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी योग्य उत्तरे देऊन सलाहकारांना प्रोत्साहित केले.

मार्केटिंग कंपन्या, विकासक, बिल्डर्स व सलाहकारांच्या दैनंदिन धोखाधडी संबधी घटना व फसवणुकी संबधी लिखित व अलिखित दोन्ही बाबींमध्ये न्याय मिळू शकतो हा आधार दिला. त्यांचे ऊद्बोधन सर्वोपरी व समाज हितकारी असे होते. त्यांची ऊपस्थिती ही संस्थेचा सम्मान वाढविणारी होती. महारेरा ट्रेनर, मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा, चार गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त मोटिव्हेशनल स्पीकर ते आता थेट रिटायर्ड न्यायमूर्ती महोदय अशी शृंखला संस्थेचा गौरव वाढविणारी आहे यात दुमत नसावे. संस्थापक अध्यक्ष राजविरसिंह यांनी नेमक्या कामाच्याच गोष्टी करुन मिटिंगमध्ये उपस्थित नविन सलाहकारांना दिलासा दिला व हा रियल ईस्टेट बिझीनेस ईमानदारीने केल्यास सर्वांना किती फलदायी, उंचीवर नेणारा आहे हे पटवून दिले. संघटनेद्वारे भविष्यात प्रशिक्षण, महारेरा रजिस्ट्रेशन प्रक्रिया, व धोखाधडी टाळण्यासाठी करावयाचे उपचार या गोष्टींवर भर दिला. त्यांनी म्हटले मला माहित नाही आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो पण जे काही करता येईल ती करायची तयारी मात्र नक्कीच ठेवू. सर्व काही कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी, प्रशिक्षित करण्यासाठी व त्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आम्ही सरकारला विनंती पण करणार आहोत की जे महारेरा नोंदणीकृत आहेत त्यांना 20 लाख ग्रुप विमा आणि रु. 5 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा सहाय्यता रक्कम मिळावी. 5 लाख वैद्यकीय विम्याची रक्कम किमान पाच वर्षांसाठी असावी, महारेरा नोंदणी पूर्वीप्रमाणेच केली जावी व रजिस्ट्रेशनचा सर्व मिळून खर्च अधिकतम १० हजारापेक्षा जास्त असू नये. या क्षेत्रात काम करणाऱ्या आणि उत्पन्न नसलेल्या कमी शिक्षित सल्लागारांवर किंवा सेवानिवृत्त लोकांवर परीक्षेचा भार न टाकता त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्यात येऊ नये, तसेच एक आयोग बनवून योग्य मार्गदर्शक तत्त्वे तयार करावीत आणि महारेरा सल्लागारांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात यावी. त्यांच्या अथक प्रयत्नाने महारेरा रजिस्ट्रेशन फिसवर लागणारे जी.एस.टी.आता रद्द करण्यात आले आहे. ही संस्थेची प्रथम उपलब्धी आहे. व अश्याच उपलब्ध्या लागोपाठ होत राहतील तेव्हा सर्व आशादायी सलाहकारांनी एकजूट होण्याचे व संघटनेचे सदस्य होण्यासाठी निवेदन केले.

आम्ही एक निवेदन पोलिस आयुक्तांना दिलेलेच आहे, पाठोपाठ आता महारेरा ॲथोरिटी व सरकारला देखील मागण्या करणार आहोत असे म्हटले. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत सल्लागारांनी सर्व सल्ले मान्य करीत अनुमोदन दिले. संचालन प्रवक्ते व मिडिया प्रभारी आनंद कोहाड यांनी केले व प्रमुख अतिथीचा परिचय करुन देतांना एक प्रेरणादायी कहाणी सांगुन उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. आभार प्रदर्शन संयुक्त कोषाध्यक्ष प्रशांत निनावे यांनी केले. या बैठकीत संस्थेचे सर्व पदाधिकारी व सलाहकार यांनी संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. त्यांच्या उपस्थित अनेक सूचनांवर चर्चा करण्यासाठी लवकरच अश्या प्रभावी बैठका घेण्यात येतील व अश्या बैठकीचे स्वरूप आणखी वाढेल ही बैठक यशस्वी व संपन्न झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिस पार्टी में कभी फूट नहीं पड़ी वो है बीजेपी

Sat Apr 6 , 2024
– सालगिरह के मौके पर फड़णवीस की शान नागपुर :- भारतीय जनता पार्टी का 45वां वर्षगाँठ समारोह नागपुर में आयोजित किया गया। इस अवसर पर उप मुख्यमंत्री देवेन्द्र फड़णवीस, प्रदेश अध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुले, उत्तर प्रदेश के पूर्व उप मुख्यमंत्री दिनेश शर्मा और अन्य गणमान्य लोग उपस्थित थे। फड़णवीस ने कहा, “भाजपा के पास दुनिया में सबसे अधिक सदस्य हैं। भाजपा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com