भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र ग्रामिण निंबधक कार्यालयातच उपलब्ध करून द्या- प्रकाश जाधव

संदीप कांबळे, कामठी

संबधित विभागाच्या तांत्रिक बाबी तपासुन येणा-या सोमवार पर्यंत शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेणार. – राजेश राऊत

कन्हान : – ग्रामीण भागाची प्रगती व्हावी याकरिता नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यालय नागपु रातच असुन ग्रामिण भागातील लोकांना भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र मिळविण्यास चकरा मारणे शेतक-याना त्रासदायक आणि खर्चिक असल्याने तातडीने ग्रा मिण भागातील शेतीची खरेदी विक्री करणाऱ्याना निबं धक कार्यालयातच भाग नकाशा व उपयोग प्रमाण पत्र ऑनलाईन स्वरूपात मिळण्याची व्यवस्था करावी. ही रास्त मागणी माजी खासदार प्रकाश जाधव यांनी के ल्याने बैठकीत प्राधिकरणाचे संचालक राजेश राऊत हयानी ऑनलाईन चर्चा करून संबधित विभागाच्या तांत्रिक बाबी तपासुन येणा-या सोमवार पर्यंत शेतक-यांच्या हिताचा निर्णय घेणार अशी हमी दिली.
नागपूर जिल्हयातील तालुका पातळीवर उपनिबंध कांचे/रजिस्टारचे कार्यालय आहे. तेथेच प्लाट, शेती खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. परंतु जेव्हा पासून एन एमआरडीएच्या कवेत ग्रामीण भाग देण्यात आला, तेव्हा पासुन ग्रामिण नागरिकांना खरेदी विक्री करण्या पूर्वी भाग नकाशा, उपयोग प्रमाणपत्र नागपुरातील एन एमआरडीए कार्यालयातून प्राप्त करावे लागते. अर्ज केल्यानंतर तातडीने भाग नकाशा मिळत नाही. याक रिता दोन ते चार दिवस लागतात. अनेकदा आठ दिव सां पेक्षा ही जास्त काळ लागु शकतो. शिवाय एनएम आरडीएच्या कार्यालयात अनेक दलाल सक्रिय झाले आहेत. ते शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांना तातडीने प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवुन अनेक शेतकऱ्यांची विनाकारण फसगत करतात. ही सर्व स्थि ती पाहता एनएमआरडीए कार्यालयाची स्थापना लोकांच्या हितासाठी, की त्यांना त्रास देण्यासाठी हाच प्रश्न उदभवल्याने यावर उपाय उपलब्ध आहेत. ज्या कार्यालयातून प्लॉट, शेतीची खरेदी विक्री होणार आहे. तेथेच एनएमआरडीए कडून ऑनलाईन आपला रेकॉर्ड उपलब्ध करून द्यावा. जेणे करून शेतकऱ्यांना वारंवा र चकरा मारण्याची गरज भासणार नाही. आणि उदया स आलेली दलाल संस्कृतीलाही मुठमाती मिळेल. ही न्यायीक समस्या सोडविण्या करिता एनएमआरडीए कार्यालय नागपुर येथे झालेल्या बैठकीत नाशिक येथुन ऑनलाईन नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संचालक मा राजेश राऊत, नागपुरचे प्रशाकीय अधि कारी निशीकांत सुके, अधिकारी मा. कातखेडे, माजी खासदार प्रकाश जाधव, कामठी, पारशिवनी, हिंगणा, कुही, उमरेड, सावनेर, नागपुर ग्रामिण तालुक्यातील सरपंच, जनप्रतिनिधी च्या उपस्थित झालेल्या बैठकीत शेतक-यांची ही रास्त मागणी असुन संबधित विभागा च्या तांत्रिक बाबी तपासुन येणा-या सोमवार पर्यंत शेत क-यांच्या हिताचा चांगला निर्णय घेणार अशी हमी मा राजेश राऊत साहेबांनी दिल्याने शेतक-यांच्या आशा प्रफुलित होऊन टाळया वाजवुन बैठक सार्थ झाल्याचा हर्ष व्यकत करण्यात आला. या बैठकीस माजी खास दार प्रकाश भाऊ जाधव यांच्या नेतुत्वात पांडुरंग बुराडे , राजेश तुमसरे, प्रविण जुमळे, मोतीराम रहाटे, राजा रामव्दार, दिलीप राईकवार, मोरेश्वर कापसे, रामकृष्ण पाहुणे, कोठीराम चकोले, रवी पारधी, सुरेश गावंडे, धनराज चकोले, दिनेशकुमार मानकर, निलेश गाडवे, विलास भोबंले, अशोक मेश्राम, श्रीराम हटवार, विजय वासनिक, ग्याणचंद्र देवळे, रविंद्र निकाळजे, मंगेश शिंदेमेश्राम, शमा निमसरकार आदी सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वडोदा येथील बार रेस्टरन्टला आग - 4 लाखाचे नुकसान

Thu Apr 28 , 2022
संदीप कांबळे,कामठी वडोदा-मौदा ता प्र 28:- मौदा पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या बडोदा येथील कुही रोड वरील स्वपनील बार अँड रेस्टरन्ट याला पहाटेच्या सुमारास आग लागली या आगीत बार मधील सर्व फर्निचर आणि गोडाऊन मध्ये ठेवलेला माल जळून खाक झाला या आगीत सुमारे 4 लाखाचे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच मौदा पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला पुढील तपास मौदा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!