– स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम
नागपूर :- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने अलीकडेच मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर आयोजित निःशुल्क नेत्र व रक्त तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था, नागपूर महानगर भाजप वैद्यकीय आघाडी आणि नागपूर शहर भाजपची ऑटोचालक आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या शिबिराला भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष बंटी कुकडे, महामंत्री रामभाऊ आंबुलकर, महामंत्री अश्विनी जिचकार, सतीश सिरस्वान, धर्मपाल मेश्राम, संदीप गवई, सुनील मित्रा, सुधीर जांभूळकर,स्वप्नील भालेकर, रिशभ अरखेल, दिलीपसिंह भादोरिया,शुभम पसफुल आदींनी शिबिराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. दोन हजारांहून अधिक नागरिकांनी नेत्र व रक्त तपासणी करून घेतली. यामध्ये रेल्वेस्थानकावरील कुली, ऑटोचालक, रिक्षाचालक, सफाई कामगार यासोबतच रेल्वेस्थानकावर येणारे प्रवासी व इतर नागरिकांनीही शिबिरात सहभागी होऊन नेत्र व रक्त तपासणी करून घेतली. नागपूरकरांच्या निरामय आरोग्यासाठी केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून सातत्याने ही शिबिरे आयोजित केली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वैद्यकीय आघाडीने नागरिकांना रेल्वे स्थानकावरील उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. या शिबिरात नेत्र तपासणीमध्ये ज्यांना मोतीबिंदू आढळला त्यांच्यावर निःशुल्क शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तर ज्यांना चष्मा आवश्यक आहे, त्यांना अत्यल्प दरात चष्मा देण्यात आला. शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी उपक्रमाबद्दल ना. नितीन गडकरी यांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गिरीश चरडे, डॉ. अजय मुखर्जी, डॉ. सारंग दांडेकर, संजय लहाने, अलीना घाटोळे, ऑटोरिक्षा संघटनेचे शहराध्यक्ष जीवन तायवाडे, महामंत्री अशोक मरसकोल्हे, शंकर मानकर, अशफाक भाई, भुपेंद्रसिंह ठाकूर, घनश्याम समसेरिया, पवन मानकर, राम धकाते, शुभम त्रिपाठी, उमेश चौधरी, संघा सदेले, नवाब भाई, संतोष बंबलेले, अजय गुलाटी, सागर मानकर, जहरुद्दिन काजी, अक्रम खान, रमेश सिल्लरवार यांनी परीश्रम घेतले.