मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती द्या – उपमुख्यमंत्री

गडचिरोली :- मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरातत्व विभागाला दिले.

मार्कंडा देवस्थानच्या विकासाकरिता एमएमआरडीसी च्या माध्यमातून मंजूर 100 कोटी रुपये व पुरातत्त्व विभागाच्या पाच कोटी रुपयांच्या प्रलंबित विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

महाशिवरात्रीला प्रथा परंपरेनुसार मंदिर परिसरात प्रसाद वितरणाला रोक न लावण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी केल्या.

तत्पुर्वी देवस्थानाची पाहणी करुन येथील हेमाडपंथी शिल्पकृतीबाबतची विशेषता व माहिती त्यांनी जाणून घेतली. 

खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यावेळी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चुनावी तैयारियां जोरों पर, राजनीतिक दलों की बढ़ी हलचल BJP चली गांव, कांग्रेस में विवाद

Mon Feb 5 , 2024
नागपुर :- आगामी लोकसभा चुनाव के लिए कुछ ही दिनों में आचार संहिता लागू हो जाएगी. इसे देखते हुए राजनीतिक दलों ने तैयारी तेज कर दी है. पार्टी संगठन को मजबूत करने के साथ-साथ सभी पार्टियां शहर और गांव स्तर पर मतदाताओं तक अनुमान लगाया जा रहा है कि चुनाव आचार संहिता 1 मार्च को लागू हो जाएगी. इसलिए अप्रैल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com