– भारतातले सगळ्यात मोठे डबल डेकर गर्डरचे लॉंचिंग सुरू
नागपूर : कामठी मार्गावर गड्डीगोदाम, गुरुद्वारा या ठिकाणी चार मजली पूल तयार करीत असून त्यासाठी विशालकाय लोखंडी स्ट्रकचर तयार करण्यात आला असून लवकरच गुरुद्वारा या ठिकाणी सदर लोखंडी स्ट्रकचर बसविण्याचे कार्य सुरु झाले असून महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी कार्य स्थळी भेट देत मेट्रो अधिकारी व कामगारांचा उत्साह वाढवत गती व सावधगीरीने निर्माण कार्य पूर्ण करण्याचे सांगितले.
डॉ. दीक्षित यांनी निर्माण कार्य स्थळी अधिकारी व कामगारांशी संवाद साधत निर्माणाधीन कठीण कार्याकरिता प्रेरित केले. उल्लेखनीय आहे कि, कामठी मार्गावरील गड्डीगोदाम या ठिकाणी भारतातले सगळ्यात मोठे डबल डेकर गर्डर विशालकाय लोखंडी स्ट्रकचर बसविण्यात येत आहे. सदर लोखंडी स्ट्रकचर बुटीबोरी एमआयडीसी या ठिकाणी तयार करण्यात आले असून आता सडक मार्गाने बुटीबोरी येथून गड्डीगोदाम या ठिकाणी ट्रेलरच्या साहाय्याने आणल्या जात आहे. निर्माण कार्य स्थळी ५०० टनची २ क्रेन व ३०० टनची १ क्रेन तसेच इतर मशिनरीज या ठिकाणी कार्यरत आहे.
या ठिकाणी देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेल्या चार स्तरीय बांधकाम केल्या जात आहे. सदर निर्माण कार्य अतिशय कठीण आणि मुख्य म्हणजे सतत व्यस्त अश्या रेल्वे लाईन गड्डीगोदाम येथील आरयुबी(RuB) येथे करण्यात येत आहे. गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत ४ स्तरीय परिवहन व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (विद्यमान आरयुबी मार्ग) रहदारी करीता असलेला रस्ता, दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, तिसऱ्या आणि चौथ्या स्तरावर उड्डानपूल आणि मेट्रो मार्गिका राहणार आहे .
महा मेट्रोच्या वतीने निर्माण कार्य स्थळी कर्मचाऱयांना प्रोत्साहित करत मेगाफोनच्या साह्याने सतत दिशा निर्देश सूचना दिल्या जात आहे. भारतीय रेल्वेचे संचालन होत असतांना योग्य खबरदारीच्या सूचना दिल्या जात आहे. जमिनीपासून २४ मीटर उंच अश्या ठिकाणी आव्हानत्मक कार्य महा मेट्रोच्या वतीने पूर्ण केल्या जात आहे. या निर्माण कार्य स्थळी सुमारे २०० अधिकारी,कर्मचारी, इंजिनियर व कामगार २४ X ७ कार्य करत आहे.
यावेळी महा मेट्रोचे संचालक (महेश कुमार) कार्यकारी संचालक (प्रशासन),मुख्य प्रकल्प प्रबंधक (रिच २) श्री.प्रकाश मुदलियार इतर मेट्रो अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.