– संदीप कांबळे,कामठी
कामठी ता प्र 5: नागपूर ग्रा पोलीस चे विशेष पोलीस महानिरीक्षक चे वाहनचालक असलेले पोलीस कर्मचारी महादेव पटले यांच्या मुलाचा काल 4 मार्च ला दुपारी 2 दरम्यान कामठी नागपूर मार्गावरील चांदणी लॉन जवळ घडलेल्या ट्रक दुचाकी अपघातात दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृतक पोलीस पुत्राचे नाव निशांत महादेव पटले वय 17 वर्षे रा महावीर नगर रणाळा कामठी असे आहे .
प्राप्त माहितीनुसार सदर मृतक निशांत पटले हा ट्रिपल सीट दुचाकी क्र एम एच 35 झेड 0579 ने जात असता विरुद्ध दिशेने येणाऱया ट्रक क्र एम एच 40 वाय 2097 च्या चालकाने सदर दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत घडलेल्या अपघातातून सदर पोलीस पुत्राचा मृत्यू झाला तर सहपाठी असलेले दोन विद्यार्थी अरब पप्पू चौधरी रा न्यू येरखेडा व मयंक सिंग रा भिलगाव हे गंभीर जख्मि असून खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत या प्रकरणातील आरोपी वाहनचालक नरेश शाहू रा कळमना नागपूर वर गुन्हा नोंदवित अटक करण्यात आले असून सदर मृतकाच्या पार्थिवावर कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शवविच्छेदन करण्यात आले मात्र अंत्यसंस्कार विधी ही मृतकाच्या मूळ गावी तिरोडा येथे करण्यात आले.सदर मृतकाच्या पाठीमागे कुटुंबात आई वडील व एक बहीण असा आप्तपरिवार आहे.
सदर मृतक विद्यार्थ्यांचे वडील महादेव पटले हे सेवानिवृत्त सैनिक असून नुकतेच दोन वर्षपूर्वी पोलीस खात्यात मिळालेल्या नोकरीसाठी कामठी येथील रणाळा येथे भाड्याने राहत आहेत तसेच नागपूर ग्रा चे विशेष पोलीस महानिरीक्षक चे वाहनचालक पदावर कार्यरत आहेत .सदर घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षक पोलीस पुत्राचा अपघाती मृत्यु
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com