नागपूर :- डॉ. राजीव चव्हाण, आयडीएएस, एनडीसी, प्रधान नियंत्रक रक्षा लेखा (दक्षिण कमांड), पुणे यांनी सैनिकांच्या वेतन व भत्यांविषयी तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मोहीम राबविली आणि वेतन लेखा कार्यालय (अ श्रे), द गार्ड्स, कामठी कार्यालयाचा व्यापक आढावा घेतला. 04 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर 2023 या कालावधीत सैनिकांच्या वेतन व भत्यांविषयी तक्रारींचे निवारण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा आढावा उत्तम अनुभवी आणि नैपुण्य असलेल्या नऊ अधिकार्यांच्या सक्षम टीमद्वारे घेण्यात आला.
सैनिकांच्या आर्थिक बाबींशी संबंधित तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती. दुपारी तीन वाजता आढावा बैठक आणि परिषद सुरू झाली. वेतन लेखा कार्यालयाचे प्रमुख राजीव जे. कुरुविला, आयडीएएस, सहाय्यक नियंत्रक रक्षा लेखा, यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
प्रास्ताविक डॉ. दळे महेश भागवत, आयडीएएस, रक्षा लेखा अपर नियंत्रक यांनी केले. त्यानंतर वेतन लेखा कार्यालयाचे प्रमुख राजीव जे. कुरुविला, आयडीएएस, असिस्टंट कंट्रोलर ऑफ डिफेन्स अकाउंट्स यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण दिले.
रक्षा लेखा प्रधान नियंत्रक ( दक्षिण कमांड) डॉ. राजीव चव्हाण, आयडीएएस, एनडीसी यांनी त्यानंतर वेतन लेखा कार्यालय (अ श्रे), द गार्ड्स, कामठीचे सर्व अधिकारी, वरिष्ठ लेखाधिकारी आणि सहायक लेखाधिकारी यांना कार्यालयीन कामकाजाविषयी निर्देश दिले.
गार्ड्स कामठी, कामठी कँटोन्मेंट आणि उमंग उपक्षेत्र, नागपूर येथे संलग्न असलेल्या लष्करी जवानांच्या वेतनासंबंधीचे सर्व जुने प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठीच्या या मोठ्या प्रमाणावरील मोहिमेसाठी त्यांनी संपूर्ण टीमचे तसेच वेतन लेखा कार्यालय (अ श्रे) च्या टीम लीडरचे त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाबद्दल कौतुक केले.
या विशेष मोहिमेसाठी अपेक्षित उद्दिष्टे आणि परिणाम साध्य करण्यासाठी टीमच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले. यामध्ये 9000 हून अधिक लष्करी जवानांच्या वैयक्तिक तक्रारींचे निवारण करण्यात आले आणि एकुण रु. 17.50 कोटींचे पेमेंट करण्यात आला आहे. हे लक्षात घेण्याजोगे आहे की ब्रिगेड ऑफ द गार्ड्स ही 18296 आर्मी ऑफिसर्स/ जेसीओ/पीबीओआर ची मजबूत सःरचना आहे. तक्रारींचे निवारण आणि प्रलंबित बाबींच्या कारवाई विषयीच्या या उदात्त कार्यात सहभागी असलेल्या सर्वांसाठी त्यांनी कौतुक करतानाच प्रमाणपत्रांसह रोख पुरस्कारांची घोषणा केली.
त्यांनी आपले विस्तृत अनुभव देखील सांगितले आणि नमूद केले की सैनिकांना पगार अचूकपणे देण्याच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे. ते आपल्या सीमांचे रक्षक आहेत. हे एक गौरवशाली कृत्य आहे.
विक्रम राजापुरे, आयडीएएस, उपनियंत्रक रक्षा लेखा, पुणे यांनी आभार मानले.